Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Police Recruitment Scam: “माझा मृत्यू झाला तर…” ऑडिओत थरारक दावा; पोलिसांमधील बोगसगिरी उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद अंत

Police Recruitment Scam: पोलिसांमधील बोगस खेळाडू प्रमाणपत्रांचे काळे रॅकेट उघड करणारा तरुण संदिग्ध परिस्थितीत मृत आढळल्याने राज्यभर खळबळ उडाली! मृत्यूपूर्वी "माझा मृत्यू झाला तर संघटना जबाबदार असेल" असे ऑडिओत सांगणाऱ्या वैभव चव्हाणच्या शरीरावर मारहाणीचे वळ मिळाल्याने हा घातपात असल्याचा संशय बळावला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 06, 2026 | 11:58 AM
Police Recruitment Scam: "माझा मृत्यू झाला तर..." ऑडिओत थरारक दावा; पोलिसांमधील बोगसगिरी उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद अंत

Police Recruitment Scam: "माझा मृत्यू झाला तर..." ऑडिओत थरारक दावा; पोलिसांमधील बोगसगिरी उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद अंत

Follow Us
Follow Us:
  • बीडमध्ये पोलीस भरती घोटाळा उघड करणारा तरुण मृत सापडला
  • मृतदेहावरील जखमांवरून नातेवाईकांनी घातपाताचा संशय
  • न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले
Police Recruitment Scam: काही दिवसांपूर्वी पुण्यासह राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेतील एक मोठा घोटाळा समोर आला होता. बोगस खेळाडू प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश बीडच्या वैभव चव्हाण या तरुणाने केला होता. मात्र, याच प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे. वैभव चव्हाण याचा संशयास्पद मृत्यू झाला असून, बीड तालुक्यातील इमामपूर शिवारात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे त्याच्या शरीरावर मारहाणीचे वळ आणि पायाला जखमा असल्यामुळे या प्रकरणामागे घातपात असल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!

अंगावर मारहाणीचे वळ आणि ऑडिओ क्लिपमधील खळबळजनक दावा

गुरुवारी वैभवचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबाने तीव्र आक्रोश केला. वैभवच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि पायाला जखमा असल्याने हा आत्महत्येचा नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मृत्यूमागे कुराश संघटनेचा हात असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, वैभवने मृत्यूपूर्वी एका मित्राला पाठवलेली ऑडिओ क्लिप समोर आली असून, तिने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “कुराश संघटनेचं रॅकेट उघडकीस आणल्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. माझा मृत्यू कशाही पद्धतीने झाला तरी त्याला कुराश संघटना जबाबदार असेल,” असे वैभवनं या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये म्हटले होते. या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Navi Mumbai: प्रेमप्रकरणातून थेट घरात घुसून उडवल्या गोळ्या; एका बहिणीच्या पाठीत गोळी घुसल्याने प्रकृती गंभीर तर दुसरीचे…

बनावट प्रमाणपत्रांमुळे हुकली होती नोकरी

मूळ बीडचा असलेला वैभव चव्हाण दोन वर्षांपूर्वी धाराशिव पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्नशील होता. २०२४-२५ मध्ये त्याने पोलीस भरतीसाठी खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. मात्र, त्याच्याइतकेच गुण असलेल्या एका अन्य उमेदवाराने खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी लाटली, ज्यामुळे वैभवची भरती होण्याची संधी हुकली. या अन्यायाविरुद्ध त्याने तीव्र पाठपुरावा सुरू केला आणि बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवून देणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर तब्बल १२ तास ठिय्या आंदोलन केले, त्यानंतर पोलिसांनी योग्य त्या आश्वासनांची पूर्तता करत तपास सुरू केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वैभव चव्हाणचा मृतदेह कुठे आणि कसा आढळला?

    Ans: वैभव चव्हाणचा मृतदेह बीड तालुक्यातील इमामपूर शिवारात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळला.

  • Que: नातेवाईकांनी या मृत्यूबाबत काय आरोप केला आहे?

    Ans: वैभवच्या शरीरावर मारहाणीचे वळ आणि पायाला जखमा असून, कुराश संघटनेने घातपात केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तसेच मृत्यूपूर्वीच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.

  • Que: वैभवने कोणता घोटाळा उघडकीस आणला होता?

    Ans: वैभवने पोलीस भरती प्रक्रियेत बोगस क्रीडा (खेळाडू) प्रमाणपत्रांच्या आधारे मिळवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर नोकऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते.

Web Title: Beed vaibhav chavan suspicious death police recruitment scam sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Beed
  • Beed News update
  • Beed Police
  • Beed Police Latest news
  • Crime Police
  • Fake Police
  • scam

संबंधित बातम्या

Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!
1

Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!

Beed: 5 हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल
2

Beed: 5 हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल

Vasai Virar News : वसई-विरारमध्ये खळबळ! मुदतबाह्य औषध प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब; प्रकरण दडपण्याचा गंभीर आरोप
3

Vasai Virar News : वसई-विरारमध्ये खळबळ! मुदतबाह्य औषध प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब; प्रकरण दडपण्याचा गंभीर आरोप

Consumer Protection Council: बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची होणार निवड; असा करा अर्ज
4

Consumer Protection Council: बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची होणार निवड; असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.