Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!

Shringeri Ghat Accident: रात्री ९ वाजता घाटात ब्रेक फेल अन् ऊसाचा ट्रक थेट खोल दरीत! क्षणार्धात संपूर्ण डोंगर आगीच्या लोळांनी वेढला गेला. मुगावच्या तरुणांनी दरीत उतरून पाहिले अन् समोर आला चालक सागर इंदलकर यांचा आगीत झालेला करुण अंत! बीडमधील या थरारक अपघाताने सर्वत्र खळबळ उडवली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 04, 2026 | 05:10 PM
Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!

Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!

Follow Us
Follow Us:
  •  ब्रेक फेल झाल्याने ऊसाचा ट्रक दरीत कोसळून पेटला
  • चालक सागर इंदलकर यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू
  • डोंगराला आग पसरली असून पोलीस व स्थानिकांकडून बचावकार्य सुरू
Shringeri Ghat Accident: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगाव मार्गे जाणाऱ्या श्रृंगेरी घाटात रात्री ९ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला आहे. ऊसाची वाहतूक करणारा एक मोकळा ट्रक घाटात अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळला. दरीत कोसळताच ट्रकने भीषण पेट घेतला, ज्यामुळे आगीचे मोठे लोळ उठले. या दुर्दैवी घटनेत ट्रक चालक सागर सोमनाथ इंदलकर यांचा आगीत गंभीररीत्या होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा:Farmer Harassment : “भिकारड्या, लायकी नव्हती तर कर्ज का घेतलं?” फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिपमुळे खळबळ!

मुगावच्या तरुणांची धाव अन् भयानक सत्य

अपघाताची माहिती मिळताच मुगाव येथील स्थानिक युवक आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रक खोल दरीत कोसळल्याने आणि आगीची तीव्रता प्रचंड असल्याने सुरुवातीला स्थानिकांना चालक दिसला नाही. मात्र, मुगावच्या काही धाडसी युवकांनी जीवाची पर्वा न करता खाली उतरून पाहणी केली असता, चालक सागर इंदलकर हे आगीत पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची पकड इतकी तीव्र होती की चालकाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

हेही वाचा: Nalasopara News: कुत्र्याला मारल्याच्या वादाचा भयानक बदला! ४०-५० जणांचा टोळका थेट घरात घुसला अन्…

डोंगराला लागली आग; पोलिसांचे बचावकार्य सुरू

ट्रकला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील डोंगरावरील झाडीनेही पेट घेतला असून आग सर्वत्र पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र, ट्रक अतिशय खोल दरीत असल्यामुळे आणि धुराचे लोट तसेच आग प्रचंड असल्याने पोलिसांना आणि स्थानिकांना पाहणी व बचावकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीडमधील श्रृंगेरी घाटात कोणता भीषण अपघात घडला?

    Ans: ब्रेक फेल झाल्यामुळे ऊसाचा एक मोकळा ट्रक दरीत कोसळला आणि त्याने पेट घेतल्याने चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

  • Que: या अपघातात मृत झालेल्या ट्रक चालकाचे नाव काय आहे?

    Ans: या अपघातात ट्रक चालक सागर सोमनाथ इंदलकर यांचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Que: अपघातानंतर परिसरात कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे?

    Ans: ट्रकला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण डोंगराला आग लागली असून खोल दरी व आगीमुळे आष्टी पोलिसांना तपास व बचावकार्यात अडथळे येत आहेत.

Web Title: Beed patoda shringeri ghat truck accident driver death sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Accident Case
  • Beed News update
  • Crime . Crime News

संबंधित बातम्या

Jalgaon Crime News: रागाच्या भरात बायकोने लगावली कानशिलात, पतीने राग मनात ठेवून घेतला भयानक बदला…
1

Jalgaon Crime News: रागाच्या भरात बायकोने लगावली कानशिलात, पतीने राग मनात ठेवून घेतला भयानक बदला…

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!
2

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

Dombivli Crime News: ‘तुझा अजून संसार नाही झाला…’ म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण…
3

Dombivli Crime News: ‘तुझा अजून संसार नाही झाला…’ म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण…

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…
4

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.