Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून काढले बाहेर; वडिलांनी डिझेलला पैसे न दिल्याने घडला संतापजनक प्रकार

मुलीचे वडिल मजूर असून, पत्नीच्या निधनानंतर 4 मुलांचे पोट भरण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांनी, माझ्याजवळ पैसे नाहीत, असे सांगून कर्मचाऱ्यांना विनवणी केली. परंतु, निर्दयी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवून दिले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2026 | 09:07 AM
बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून काढले बाहेर; वडिलांनी डिझेलला पैसे न दिल्याने घडला संतापजनक प्रकार

बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून काढले बाहेर; वडिलांनी डिझेलला पैसे न दिल्याने घडला संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थिनीला फिट आली आणि ती पडली बेशुद्ध 
  • आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांनी मागितले डिझेलचे पैसे 
  • पैसे न दिल्याने थेट रुग्णावाहिकेतूनच उतरवले खाली
बीड : रुग्णवाहिकेच्या डिझेलचे पैसे देऊ शकत नसल्याने रोजमजुरी करणाऱ्या एका पित्याला आपल्या ११ वर्षांच्या बेशुद्ध मुलीला खांद्यावरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड आरोग्य केंद्रात घडलेल्या या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश ढाकणे यांना पदावरून हटवले आहे.

या घटनेची माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंदल यांनी सांगितले की, डॉ. ढाकणे यांच्या निलंबनासह त्यांच्यावर शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फिट (झटके) आले आणि ती बेशुद्ध पडली. शाळेतील कर्मचाऱ्यांनी तिला दिंद्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉ. ढाकणे यांनी तिला मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मुलीचे वडील आणि कुटुंबीय रुग्णवाहिकेत बसले, तेव्हा आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांनी त्यांना डिझेलचे पैसे मागितले.

गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले

दरम्यान, मुलीचे वडिल मजूर असून, पत्नीच्या निधनानंतर 4 मुलांचे पोट भरण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांनी, माझ्याजवळ पैसे नाहीत, असे सांगून कर्मचाऱ्यांना विनवणी केली. परंतु, निर्दयी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवून दिले होते.

प्रश्न : नेमके काय घडले? कुठे?

उत्तर : घटना बीड जिल्हा, माजलगाव तालुका, दिंद्रुड गाव प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) येथे ही घटना घडली.

प्रश्न : मुलगी आता कशी आहे?

उत्तर: मुलगी उपचारानंतर आता स्थिर आहे, घरी परतली आहे. पण या घटनेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर आणि गरीब रुग्णांना वागणूक यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा केला.

दुसरी घटना पुण्यात घडली का?

उत्तर : हो, 11 ऑक्टो 2026 ला पुणे – पिंपरी YCM हॉस्पिटलच्या चालत्या रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह रुग्ण रस्त्यावर पडला. ड्रायव्हर आणि वॉर्ड बॉयला निलंबित केले.

Web Title: Unconscious girl was taken out of the ambulance nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • Beed News

संबंधित बातम्या

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद
1

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.