श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी येथील बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा सभासदांना 15 टक्के डिव्हिडंड वाटप आणि शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 141 गुणवंतांचा सन्मान सोहळा कार्यक्रम अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेखक व दिग्दर्शक अभिजित दळवी, सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांच्या शुभहस्ते पार पडला.
आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा झाली असून सहकारात देखील स्पर्धा निर्माण झाली आहे. ठेवी मिळवणे, कर्ज वितरण करणे, वसुली करणे,पतसंस्था पुढे नेणे याबाबतीत स्पर्धा चालू आहे. व्यापारी पतसंस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात गोरगरिबांना किराणा ,धान्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. पतसंस्थेच्या रुग्णवाहिकेने निशुल्क पणे सेवा दिली. शाळेला मदत, मस्जिद ला मदत अशा अनेक सामाजिक कार्यात पतसंस्था अग्रेसर राहिली आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेची ही पतसंस्था कामधेनू बनली आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केले.
सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी बोलताना सांगितले की, तालुक्यात व्यापारी पतसंस्थेचे कार्य चांगले असून या पतसंस्थेच्या शाखाविस्ताराच्या बाबतीत लागेल ते सहकार्य हे आमच्या कार्यालयाकडून केले जाईल. सचिव किसन वऱ्हाडे यांच व्यवस्थापन चांगले असून बदलत्या काळानुसार सहकारातील बदलत चाललेली धोरण संस्थेने राबविली आहेत.
बेलवंडी व्यापारी पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांना स्थापन झाल्यापासून डिव्हिडंड वाटप करीत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. कुंकूमार्चन हा लघुपट चा पुरस्कार स्वीकारताना जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद आज हा पतसंस्थेचा कार्यक्रम पाहून वाटत आहे,141 वेगवेगळ्या गुणवंतांचा सन्मान आज पतसंस्थेने केला आहे .याचा मनस्वी आनंद होत आहे. असे मत लेखक व दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी बोलताना व्यक्त केले.
व्यापारी पतसंस्थेचे मार्गदर्शक उत्तम डाके यांनी बोलताना सांगितले की, पतसंस्थेला स्थापन झाल्यापासून ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. संस्थेकडे आज 35 कोटीच्या ठेवी असून पतसंस्था ही पूर्णपणे स्वभांडवलावर दिमाखात उभी आहे.संस्थेचा पारदर्शक कारभार हा सर्व सभासद व हितचिंतक यांच्या आशीर्वादा ने चांगल्या प्रकारे चालू आहे.
यावेळी श्रीगोंदा कारखाण्याचे माजी व्हा. चेअरमन ज्ञानदेव हिरवे,उपसरपंच उत्तम डाके, मुरलीधर ढवळे,संग्राम पवार,सुभाष काळाने, पत्रकार बाळासाहेब काकडे, दिनेशआबा इथापे, शाहीर निजामभाई शेख, यांनी मनोगत व्यक्त करत पतसंस्थेच्या कारभाराला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सोसायटी चे चेअरमन सुखदेव लाढाणे,समता पतसंस्थेचे चेअरमन सुनिल ढवळे, गंगाराम हिरवे, प्राचार्य उत्तम बुधवांत, मा. प्राचार्य, तात्याबा हिरवे, संपत पवार, एकनाथ बोरुडे, विलासराव भोसले,अर्जुन हिवरकर, सचिव किसन वऱ्हाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन सोपान हिरवे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केशव कातोरे तर आभार व्हा. चेअरमन युवराज पवार यांनी मानले. यावेळी पतसंस्थेचे सर्व संचालक,ठेवीदार,हितचिंतक,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पत्रकार, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर ,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस,रुग्णवाहिका चालक, आदर्श शिक्षक- शिक्षिका,गुणवंत विद्यार्थी, यांचा व्यापारी पतसंस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.