
ऐन उन्हाळ्यात कलिंगडाचे बाजारभाव कोसळले; शेतकरी हवालदिल, हवामान अनुकूल पण मागणी…
यंदा १४ मार्च रोजी धरणातून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनामुळे भामा-भीमा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे तब्बल १८ बंधारे पाण्याने भरले. धरणापासून दौड तालुक्यातील आलेगावपागा पर्यंत पाण्याची उपलब्धता निर्माण झाली आहे. परिणामी, उन्हाती पिकांना पाणी मिळण्याबरोबरच विविध पाणीपुरवठा योजनांनाही मोठा हातभार लागला आहे.
सध्या धरणातील पाण्याची पातळी ६६५.६८ द.ल.घ.मी इतकी आहे. एकूण पाणीसाठा १५०.६३५ द.ल.घ.मी आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १४७.११३ द.ल.घ.मी इतका असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाचा साठा मागील वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याने परिस्थिती अधिक स्थिर असल्याचे दिसून येते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढील काळात आवश्यकतेनुसार धरणातून आणखी पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. एकूणच, भामा आसखेड धरणातील समाधानकारक साठ्यामुळे शेती, पाणीपुरवठा आणि नागरी जीवनाला मोठा दिलासा मिळाला आहे.