Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: कुपोषणाचे आव्हान अद्यापही कायम! १०४ बालके अतितीव्र कुपोषित; पवनीत कमी वजनाची बालके सर्वाधिक

भंडारा जिल्ह्यातील बालकांच्या पोषणाची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 104 बालके अतितीव्र कुपोषित असून पवनीमध्ये कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 10.83 टक्के आहे. संदर्भातील या अहवालातून अंगणवाड्यांसमोरील आव्हानेही समोर आली आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 17, 2026 | 04:58 PM
Bhandara Child Malnutrition Crisis Anganwadi Report (फोटो सौजन्य-AI एआय)

Bhandara Child Malnutrition Crisis Anganwadi Report (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • भंडारा जिल्ह्यातील 45,717 बालकांच्या वजन तपासणीत 104 बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहे.
  • पवनी प्रकल्पात कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 10.83 टक्के असून जिल्ह्यातील सर्वाधिक नोंद झाली आहे.
  • जिल्ह्यातील 63 अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती नाहीत, तर मदतनीसांची 96 पदे रिक्त आहेत.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रांचे जाळे उभारण्यात आले असले, तरी जिल्ह्यातील कुपोषणाचे आकडे चिंताजनक वास्तव समोर आणत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या ऑक्टोबरच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सात प्रकल्पांमधील ४५ हजार ७३५ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ४५ हजार ७१७ बालकांचे वजन घेण्यात आले. या तपासणीत ३ हजार ९४ बालके कमी वजनाची, ४३४ बालके तीव्र कमी वजनाची, ८३१ बालके मध्यम तीव्र कुपोषित, तर १०४ बालके अति तीव्र कुपोषित श्रेणीत असल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांमधील पोषण आहार, नियमित वजन तपासणी आणि कुपोषित बालकांच्या पाठपुराव्याला अधिक प्रभावी करण्याचे प्रशासनासमोर आहे.

आव्हान कुपोषणाच्या प्रश्नाबरोबरच अंगणवाडी केंद्रांच्या भौतिक सुविधांचाही विचार महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार २५२ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी १ हजार १८९ केंद्रांना स्वतंत्र इमारती आहेत. उर्वरित ६३ केंद्रे स्वतंत्र इमारतींमध्ये कार्यरत नाहीत. यामध्ये २९ केंद्रे भाड्याच्या इमारतीत, ११ शाळांमध्ये, १५ समाजमंदिरांत, तर ८ केंद्रे ग्रामपंचायत इमारतीत भरतात. स्वतंत्र इमारती नसलेल्या केंद्रांमध्ये भंडारा प्रकल्पातील १०, पवनीतील १७, लाखनीतील ११, साकोलीतील १०, तुमसरमधील ७, लाखांदूरमधील ६ आणि मोहाडीतील २ केंद्रांचा समावेश आहे. पवनी प्रकल्पात स्वतंत्र इमारतींचा अभाव सर्वाधिक आहे. अहवालानुसार सर्व १ हजार २५२ केंद्रांमध्ये शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे.

रात्रीच्या अंधारात मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणं पडलं महागात! एसटी चालक-वाहकांचे निलंबन, परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!

प्रकल्पनिहाय आकडेवारी पाहता पवनी प्रकल्पात कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण सर्वाधिक १०.८३ टक्के आहे. या प्रकल्पात ६११ बालके कमी वजनाची, ८३१ बालके मध्यम तीव्र कुपोषित श्रेणीत ८८ बालके तीव्र कमी वजनाची, १५६ बालके मध्यम तीव्र कुपोषित, तर १७ बालके अति तीव्र कुपोषित श्रेणीत आहेत. लाखांदूर प्रकल्पात कमी वजनाची ४१४, तीव्र कमी वजनाची ६४, मध्यम तीव्र कुपोषित १३९ आणि अति तीव्र कुपोषित २१ बालके नोंदविण्यात आली आहेत.

भंडारा प्रकल्पात ६७२ बालके कमी वजनाची, ८८ तीव्र कमी वजनाची, १३० मध्यम तीव्र कुपोषित आणि ९ अति तीव्र कुपोषित आहेत. मोहाडी प्रकल्पात अनुक्रमे ३७१, ५५, १११ आणि ११ बालके या श्रेणींत आहेत. तुमसरमध्ये २८२ कमी वजनाची, ४३ तीव्र कमी वजनाची, ९४ मध्यम तीव्र कुपोषित आणि १९ अति तीव्र कुपोषित बालके आहेत. लाखनीत ३६६ कमी वजनाची, ५१ तीव्र कमी वजनाची, ९३ मध्यम तीव्र कुपोषित आणि १७ अति तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत.

Bhandara News: दहा महिन्यांत विम्याचे ११७ प्रस्ताव मंजूर! २.३४ कोटी निधीची प्रतीक्षा; गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

साकोली प्रकल्पात ३७८ कमी वजनाची, ४५ तीव्र कमी वजनाची, १०८ मध्यम तीव्र कुपोषित आणि १० अति तीव्र कुपोषित बालकांच नोंद आहे. विशेष म्हणजे, अति तीव कुपोषित बालकांची संख्या लाखांदूरमध्य २१, तुमसरमध्ये १९, तर लाखनी आणि पवनीमध्ये प्रत्येकी १७ आहे. या आकडेवारीतून प्रत्येक प्रकल्पातीत्न पोषणविषयक स्थिती वेगवेगळी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सर्व प्रकल्पांसाठी एकसारख्या उपाययोजनांऐवजी स्थानिक स्थितीनुसार पोषणविषयक देखरेख आणि उपचारात्मक पाठपुरावा आवश्यक आहे.

जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची १ हजार २५२ पदे मंजूर असून त्यापैकी १९ पदे रिक्त आहेत. मदतनीसांचीही १ हजार २५२ पदे मंजूर असताना ९६ पदे रिक्त आहेत. सेविका आणि मदतनीस यांच्यावर बालकांची देखभाल, पूरक पोषण आहाराचे वितरण, वजन तपासणी, नोंदी ठेवणे आणि पालकांशी संपर्क अशा विविध जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे रिक्त पदांचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भंडारा जिल्ह्यात किती बालके अतितीव्र कुपोषित आढळली आहेत?

    Ans: ऑक्टोबर महिन्याच्या अहवालानुसार भंडारा जिल्ह्यातील 104 बालके अतितीव्र कुपोषित आढळली आहेत.

  • Que: भंडारा जिल्ह्यात कोणत्या प्रकल्पात कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

    Ans: पवनी प्रकल्पात कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 10.83 टक्के असून ते जिल्ह्यात सर्वाधिक आहे. येथे 611 बालके कमी वजनाची आहेत.

  • Que: भंडारा जिल्ह्यात किती अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती नाहीत?

    Ans: जिल्ह्यातील 1,252 अंगणवाडी केंद्रांपैकी 63 केंद्रांना स्वतंत्र इमारती नाहीत. यापैकी 29 केंद्रे भाड्याच्या इमारतीत, 11 शाळांमध्ये, 15 समाजमंदिरांत आणि 8 ग्रामपंचायत इमारतींमध्ये भरतात.

Web Title: Bhandara child malnutrition news anganwadi report 104 children ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

Sangali News: माधवनगर रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गप्प का? नितीन शिंदेंचा सवाल
1

Sangali News: माधवनगर रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गप्प का? नितीन शिंदेंचा सवाल

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती
2

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात
3

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान
4

Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.