Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडली, साडेचार एकरांतील धान करपले आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही डोक्यावर… भंडाऱ्यातील शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या 5 दिवसांत घडलेल्या या घटनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 09, 2026 | 05:29 PM
Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
Follow Us
Follow Us:
  • धोप येथील शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी पालकमंत्र्यांसमोर 3 ऑक्टोबर रोजी आर्थिक अडचणी मांडल्या होत्या.
  • साडेचार एकरांतील धानपीक पाण्याअभावी करपल्याने शेतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता.
  • शेतकऱ्याच्या मृत्यूने दुष्काळ, सिंचन, पीक नुकसानभरपाई आणि आर्थिक मदतीचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले.
मोहाडी. ‘शेतीत पीक नाही, हातात पैसा नाही… मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा?’ या विवंचनेत असलेल्या धोप येथील शेतकरी राजेंद्र अमर सपाटे (५५) यांनी काही दिवसांपूर्वी आपली व्यथा थेट पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासमोर मांडली होती. दुष्काळाने साडेचार एकरांतील धान करपले होते. पशुपालनाचा खर्च होता. मुलगा अकोला येथे, तर मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत होती. घरखर्च आणि शिक्षणाचा भार डोक्यावर होता. मदतीची आस होती. आपल्या अडचणी मांडल्यानंतर परिस्थितीत काहीतरी बदल होईल, अशी अपेक्षा असतानाच अवघ्या पाच दिवसांनी गुरूवारी पहाटे त्यांनी जीवन संपविले.

‘साहेब, आता आत्महत्या करण्याची वेळ आली…’ : ३ ऑक्टोबर. पालकमंत्री डॉ. भोयर यांचा दुष्काळ पाहणी दौरा. परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत असताना सपाटे यांनी पुढे येत आपली व्यथा मांडली. साडेचार एकरांतील धान पाण्याअभावी करपले. शेतीत पैसा उरला नाही. जनावरांच्या चाऱ्याचा खर्च वाढला. दूध उत्पादनही घटले. त्यात मुलगा आणि मुलगी शिक्षणासाठी घरापासून दूर. दरमहा त्यांच्या शिक्षणासाठी पैसे पाठवावे लागतात. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा, हा प्रश्न त्यांनी मांडला. परिस्थिती अशीच राहिली तर आत्महत्या करण्याची वेळ येईल.

Bhandara: शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

यंदा धानाची लागवड केली; पण पावसाने साथ सोडली. शेतीला पाणी देणाऱ्या तलावात पुरेसा साठा नव्हता. पिकाची वाढ खुंटली आणि उभे धान डोळ्यांसमोर करपताना पाहण्याची वेळ आली. शेतीचा खर्च मात्र कमी झाला नाही. मशागतीची साधने, मजुरी, खते आणि अन्य निविष्ठांच्या वाढत्या खर्चाने कंबरडे मोडले. शेतीला जोडधंदा असलेल्या पशुपालनातूनही अपेक्षित आधार मिळत नव्हता. अशा परिस्थितीत वर्षभराच्या उत्पन्नाचा आधार असलेले पीक हातातून निसटले. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाचा ताण आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च या सगळ्या चिंता एकवटत गेल्या.

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय

धान करपले… आशा, अपेक्षांवर फेरले पाणी

पहाटे आली काळीज पिळवटून टाकणारी बातमी आजची पहाट धोपकरांसाठी नेहमीसारखी उगवली नाही. सपाटे यांनी शेतातील खासगी विहिरीत उडी घेतल्याची बातमी गावात पसरली आणि काही क्षणांतच गावावर शोककळा पसरली. ज्याने काही दिवसांपूर्वी आपली व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडली होती, तोच शेतकरी आता या जगात नव्हता. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच गावात अस्वस्थता घोधावत आहे.

एक मृत्यू… अनेक प्रश्न : राजेंद्र सपाटे यांच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर दुष्काळाच्या छायेत जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा समोर आणले आहे. पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत घडलेली ही घटना ग्रामस्थांच्या मनाला चटका लावून गेली आहे. ‘शेतकरी बोलतो तेव्हा त्याची व्यथा ऐकली जाण्यापेक्षा त्यावर वेळीच कृती झाली पाहिजे. शासनाने आता पाऊल उचलले नाही, तर अशा घटना थांबणार कशा?’ हा सवाल शेतकऱ्यांच्या मनात्त धुमसत आहे.

Web Title: Bhandara farmer death drought crop loss farmer distress maharashtra news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Bhandara
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
2

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
3

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
4

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.