Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’! लाखनी ‘पुस्तकांचे गाव’; मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांची घोषणा

भंडारा जिल्ह्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आला असून यामुळे साहित्य क्षेत्रात मोठे बदल घडणार आहेत. दोन गावांना विशेष सांस्कृतिक ओळख मिळण्यासोबतच स्थानिक साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नवनवीन उपक्रम राबवण्याचा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 21, 2026 | 05:30 PM
Bhandara News: गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’! लाखनी ‘पुस्तकांचे गाव’; मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांची घोषणा
Follow Us
Follow Us:
  • भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर ‘कवितेचे गाव’ तर लाखनी ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विकसित करण्याची अधिकृत घोषणा झाली.
  • प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेसाठी स्वतंत्र कक्ष आणि ‘मराठी भाषा अधिकारी’ नियुक्त केला जाणार आहे.
  • बोलीभाषा शब्दकोश, मासिक प्रकाशन आणि वार्षिक जिल्हा साहित्य संमेलनांच्या माध्यमातून साहित्यिकांना नवे व्यासपीठ मिळणार आहे.

मराठी भाषा विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ‘कवितेचे गाव’ आणि ‘पुस्तकांचे गाव’ विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील कवी ना. रा. शेंडे यांचे गणेशपूर हे गाव ‘कवितेचे गाव’ म्हणून, तर ज्येष्ठ लेखक द. सा. बोरकर यांचे लाखनी हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. यावेळी मराठी शाळा सुरू राहाव्यात, मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचावी आणि साहित्य व भाषा विभागात अधिक प्रभावी संवाद राहावा, याबाबत साहित्यिकांनी विविध सूचना मांडल्या.

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

तसेच, प्रत्येक – जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्यासाठी मराठी भाषा अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मराठी माध्यमांच्या शाळांचे संवर्धन, झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन आणि जिल्ह्यात स्वतंत्र नाट्यगृहाची निर्मिती तातडीने करण्याबाबतच्या मागण्या करण्यात आल्या. या बैठकीत प्रा. सुमंत देशपांडे, सुरेश खोब्रागडे, डॉ. ममता राऊत, विवेक कापगते, लक्ष्मीकांत कापगते, अमृत बनसोड यांच्यासह जिल्ह्यातील ७० हून अधिक साहित्यिक, लेखक आणि कवी उपस्थित होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे उपस्थित होते. संचालन राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी केले. आभार अभिषेक नामदास यांनी मानले.

Bhandara News: एकलारीत वीजतारा तुटून ३ शेळ्यांचा मृत्यू! महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

मराठी भाषा विभागाचे मासिक सुरू करणार

यावेळी मंत्री डॉ. सामंत म्हणाले, महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा या मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या असून, विविध बोलीभाषांतील शब्दांचा स्वतंत्र बोलीभाषा शब्दकोश तयार करण्यात येईल. डॉ. यशवंतराव चव्हाण अनुवाद समितीच्या माध्यमातून साहित्याचे अनुवाद, प्रकाशन व वितरणाची कारवाई केली जाईल. विभागीय स्तरावर पुस्तक परीक्षण समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. दरवर्षी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘चांदा ते बांदा’ संकल्पनेतून राज्यातील साहित्यिक, लेखक आणि कवींना एकत्र आणले जाईल तसेच बोलीभाषा, साहित्य व लेखनाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठी भाषा विभागाचे मासिक सुरू करण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Bhandara ganeshpur lakhani kavitache pustakanche gav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.