Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara: भंडारा-बालाघाट महामार्गाला अखेर गती! प्रकल्पामुळे विकासाचा नवा मार्ग; समृद्धी महामार्गाशी जोडणार

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या भंडारा-तूमसर-बालाघाट चौपदरी महामार्गाच्या कामाला पाच वर्षांनंतर अखेर वेग मिळाला आहे. ८०० कोटींच्या या प्रकल्पासाठी तुमसर ते बपेरा मार्गावर काम सुरू झाले असून भूमिअधिग्रहण प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 10, 2026 | 06:37 PM
Bhandara: भंडारा-बालाघाट महामार्गाला अखेर गती! प्रकल्पामुळे विकासाचा नवा मार्ग; समृद्धी महामार्गाशी जोडणार
Follow Us
Follow Us:
  • भंडारा-तुमसर-बालाघाट या ८०० कोटींच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सुरुवात झाली आहे.
  • पहिल्या टप्प्यात तुमसर ते बपेरा रस्त्याचे काम सुरू झाले असून इतर प्रस्तावित उन्नत मार्गांसाठी भूमिअधिग्रहण वेगाने राबवले जात आहे.
  • तीन टप्प्यांत पूर्ण होणाऱ्या या महत्त्वाकांक्षी महामार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमधील प्रवास अधिक सुलभ अन् वेगवान होईल.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या भंडारा तुमसर-बालाघाट चौपदरी महामार्ग प्रकल्पाला पाच वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र हद्दीतील प्रस्तावित कामांची प्रशासकीय प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर पूर्ण केली जात असून, तुमसर ते बपेरा मार्गावरील द्वि-पथांच्या रस्त्याच्या कामासाठी कंत्राट निश्चित करण्यात आले असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार, लवकरच वरठी, मोहाडी आणि खापा येथे प्रस्तावित महामार्ग उन्नत मार्गाचे बांधकाम सुरू होणार आहे. याकरिता भूमिअधिग्रहण प्रक्रिया अत्यंत वेगाने राबवली जात आहे.

Bhandara Crime: संतापजनक! 3 वर्षीय बालिकेला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेलं; आणि…, आज ‘भंडारा बंद’

सुमारे पाच वर्षांपूर्वी भंडारा ते बालाघाट दरम्यानच्या १०५ किमी लांबीच्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा घोषित करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजे किंमत ८०० कोटी रुपये असून तीन टप्प्यांत हे काम पूर्ण करण्याचे निश्चित लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात भंडारा ते तुमसर, दुसऱ्या टप्प्यात तुमसर ते वारासिवनी आणि तिसऱ्या टप्प्यात वारासिवनी ते बालाघाट अशा तीन टप्प्यांत हा महामार्ग निर्माण करण्याचे नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमधील दळणवळण अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर

तुमसर ते बपेरा दरम्यानच्या मार्गात येणाऱ्या अनेक गावांमध्ये जमिनी अधिग्रहित करण्यासाठी प्रशासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यात महलगाव, देवसर्रा, बिनाखी, ब्राह्मणटोला, गोंदेखारी, सिंदपुरी, चुल्हाड, बपेरा, सिहोरा, मच्छेरा, रनेरा, बघेरा, मोहगाव खदान, सितेपार, सुकळी, हरदोली आणि खैरलांजी या गावांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व भागांत प्रशासनाकडून भूमिअधिग्रहण प्रक्रिया अत्यंत तीव्रतेने सुरू आहे. दरम्यान, जुन्या राज्य मार्गावर द्वि-पथ रस्त्याचे बांधकामही वेगाने सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Bhandara tumsar balaghat four lane highway work begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Bhandara
  • Local News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.