
टोरंट प्रकल्पाच्या जंगलतोडीमुळे वन्यजीवांवर स्थलांतराची वेळ ( सौजन्य - सोशल मीडिया )
Washim News: वाशिम जिल्ह्यात वाढतोय साथरोगांचा प्रादुर्भाव; आरोग्य विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन
भीमाशंकर अभयारण्य मध्ये सुरू असलेल्या जंगलतोड यामुळे पक्षी प्राणी यांनी स्थलांतरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या जंगलातील पक्षी आणि प्राणी यांनी येथील झाडे नष्ट झाल्याने आपला अधिवास शोधण्यास सुरुवात केली आहे. आता केवळ 5000 झाडे तुटली असून उर्वरित 27 हजार झाडे तुटल्यानंतर येथे पक्षी आणि प्राणी राहतील काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.दुसरीकडे शासन 32480 झाडे तोडणारा आहे पण प्रत्यक्षात तीन लाख झाडे तुटणार आहेत असे स्थानिक आणि पर्यावरण प्रेमी यांचे म्हणणे आहे.
या जंगल तोडीचा सर्वाधिक मोठा फटका प्राणी आणि पक्षांना बसत आहे. त्यात अनेक ठिकाणी चांगले जंगल आणि वनसंपदा असलेले ठिकाणी पाणी स्थलांतरण करीत आहेत.त्यातील एक नीलगाय टोरंट धरणासाठी जंगल तोडलेल्या ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हास नदी परिसरात पोहचले आहे. वावें गावच्या हद्दी सायंकाळी नीलगाय आणि त्याचे बछडा दिसून आले.
भाताच्या शेतात हे नीलगाय दिसून आल्याने अनेकांनी ती नीलगाय आपल्या शेतात जाऊन भाताच्या पिकाचे नुकसान करणार नाही याची काळजी घेत होते.मात्र रात्री त्या नीलगाय ने भाताच्या शेतात प्रवेश करून नुकसान केल्याने शेतकरी रात्रभर नीलगाय शोधत होते. दुसरीकडे नीलगाय सारखे असंख्य प्राणी पाली सायडोंगर येथील जंगलाच्या बाहेर पडल्याने प्राणीमित्र प्रचंड त्रस्त आहेत. यामुळे आता फक्त जंगलतोडीचा परिणाम फक्त प्राण्यांवरच नाही तर इतर त्याचा परिणाम इतर घटकांवरही तितकाच तिव्रतेने दिसत आहे.
Ans: टोरंट प्रकल्पासाठी परिसरात सुरू असलेल्या प्रचंड जंगलतोडीमुळे झाडे नष्ट झाल्याने पक्षी व प्राण्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.
Ans: जंगलापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हास नदीलगतच्या वावे गावाच्या हद्दीत भाताच्या शेतात नीलगाय आणि तिचे पिल्लू दिसून आले.
Ans: हजारो झाडे तोडल्यामुळे वन्यजीव अन्नाच्या शोधात शेतात येत आहेत, ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने पर्यावरणप्रेमी त्रस्त आहेत.