Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhimashankar मध्ये वृक्षतोड सुरू आहे की नाही? उडालेल्या संभ्रमानंतर वन विभागाकडून झाला ‘हा’ खुलासा

Bhimashankar: राज्य सरकारने मात्र या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 26, 2026 | 07:54 PM
टोरंटच्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून संभ्रम

टोरंटच्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून संभ्रम

Follow Us
Follow Us:
  • भीमाशंकर नव्हे, कर्जतच्या जंगलात वृक्षतोड
  • पुणे वनविभागाचा खुलासा
  • टोरंटच्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून संभ्रम
सुनयना सोनवणे /Bhimashankar: भीमाशंकर अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित होत असताना, भीमाशंकर अभयारण्यात कोणतीही अवैध वृक्षतोड सुरू नसल्याचे पुणे वन आणि वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात टोरंट कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड कर्जत तालुक्यातील पाली आणि ढाक परिसरात होत आहे. भीमाशंकरपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागातील वृक्षतोडीची अभयारण्यातील वृक्षतोडीशी गल्लत झाल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे वनविभागाने सांगितले.

कर्जतच्या सह्याद्री खोऱ्यात टोरंट कंपनीकडून तीन हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण (पंप्ड स्टोरेज) प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने २३३ हेक्टर वनक्षेत्र वळते केले आहे. या क्षेत्रात एकूण ३२ हजार ४९० झाडे तोडली जाणार असून, आतापर्यंत १ हजार ८२५ झाडांची तोड करण्यात आली आहे. वनक्षेत्र वळते करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेनुसार वृक्षतोड सुरू करण्यात आली आहे.

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?

पर्यावरण प्रेमींचा विरोध

दरम्यान, सह्याद्रीच्या परिसरातील या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे. हजारो झाडे तोडल्यामुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास, जैवविविधता आणि स्थानिक जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जुन्या आणि नैसर्गिक जंगलाची हानी केवळ नवीन वृक्षारोपण करून भरून काढता येणार नाही, असा दावा पर्यावरण कार्यकर्त्यांनी केला आहे. वृक्षतोड सुरू असलेला परिसर पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्राचा भाग असल्याने प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करावा, तसेच पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

सरकारची भूमिका

राज्य सरकारने मात्र या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकल्पामुळे कोळशावर आधारित वीजनिर्मितीवरील राज्याचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, अशी सरकारची भूमिका आहे. वनजमिनीच्या वापरामुळे होणाऱ्या निसर्गहानीची भरपाई म्हणून ९० हजार नवीन झाडे लावण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि सुनावण्या पूर्ण केल्यानंतरच प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर परिणाम झाल्यास त्यांच्या तक्रारी ऐकून योग्य तो मार्ग काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

Aaditya Thackeray : ‘मरण आलं तरी चालेल, पण लढा थांबणार नाही!’ साय डोंगरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

वनविभागाकडून नागरिकांना आवाहन

पुणे वन विभागाचे वनसंरक्षक आणि वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. भीमाशंकर अभयारण्यात कंपनीच्या प्रकल्पासाठी अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या समाजमाध्यमांसह विविध माध्यमांतून प्रसारित होत आहेत. मात्र, अभयारण्यात अशा प्रकारची कोणतीही अवैध वृक्षतोड सुरू नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या स्पष्टीकरणाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेमके प्रकरण काय आहे?

    Ans: भीमाशंकर अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

  • Que: वन विभागाचा खुलासा काय?

    Ans: प्रत्यक्षात टोरंट कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड कर्जत तालुक्यातील पाली आणि ढाक परिसरात होत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Pune forest department press relase about karjat tree cutting bhimashankar torent project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • bhimashankar
  • Forest Department
  • Karjat
  • tree cutting

संबंधित बातम्या

Navrashtra Impact : शेवगावमधील हजारो झाडांच्या कत्तलीप्रकरणी सत्यजित तांबे आक्रमक! मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी
1

Navrashtra Impact : शेवगावमधील हजारो झाडांच्या कत्तलीप्रकरणी सत्यजित तांबे आक्रमक! मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?
2

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम
3

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

Torent Dam: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल? वन अधिकारी कुठे आहेत; कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल
4

Torent Dam: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल? वन अधिकारी कुठे आहेत; कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.