
Raj Thackeray: आज संध्याकाळी राज गर्जना, स्थानिकांची भेट घेत ठाकरी शैलीत दिलं मोठं आश्वासंन
Raj Thackeray: रायगडच्या कर्जत येथील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज संध्याकाळी राज ठाकरे यांची भव्य सभा येथे पार पडणार असून त्यांनी पर्यावरणप्रेमींना येथे येण्याचे आवाहन करताना हे सरकार हा प्रकल्प कसं बंधनकारक करतो ते बघा अशा इशारा राज ठाकरेंनी आपल्या शैलीत दिला आहे.
बुधवारी राज ठाकरे यांनी कर्जतचा दौरा करताना सह्याद्रीचा भाग असलेल्या साय डोंगराची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना येथे येण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत राज ठाकरेंनी येथे पाहणी दौरा तर केलाच शिवाय येथे त्यांची संध्याकाळी एक भव्य दिव्य ठाकरी सभाही पार पडणार आहे.
या दौऱ्यात सकाळच्या सत्रात राज ठाकरे यांनी स्थानिकांशी चर्चा केली. त्यांच्या भावणा जाणून घेत संध्याकाळी पर्यावरणप्रेमींना या सभेला येण्याचं आवाहन केलं. सभेला संध्याकाळी या, कसं हा प्रकल्प बंधनकारक कतरार ते बघतोच असा विश्वास त्यांनी स्थानिकांना दिला.
तसं पाहता, कर्जत भीमाशंकरमधील झाडांच्या कत्तलीचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचा संताप झाला होता. एका खासगी कंपनीसाठी अशाप्रकारे शेकडो वर्षे जुनी झाडे कापण्याचा केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आदेशाविरोधात जनआक्रोश उमटला होता. राज्यात दुष्काळाचं सावट असताना असे प्रकल्प राबवून पर्यावरणाची हानी पोहचवू नये अशी विनंती त्यांच्यावतीनं करण्यात येत होती.
गुजरात राज्यातील टॉरेंट पॉवर कंपनीचा प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प साई डोंगर परिसरात उभारला जाणार आहे. अंदाजे 13 हजार 500 कोटी रुपये खर्च आणि 3 हजार मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी तीन लाखांवर झाडे तोडली जाणार आहेत. याचे गंभीर पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात आणि पक्षी, वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
डोंगर उतारावरील मृदा संवर्धन, नैसर्गिक जलप्रवाह, पारंपरिक शेती आणि पर्यटन यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विकासाच्या नावाखाली कर्जत-भीमाशंकरची नैसर्गिक संसाधने का नष्ट केली जात आहेत, असा प्रश्न पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला आहे.
आता याप्रकरणी राज ठाकरे आपल्या ठाकरी शैलीत सरकारचा कशाप्रकारे समाचार घेतात ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात मनसेचे युवा नेते व पर्यावरणप्रेमी अमित ठाकरेही सोबत आहेत. तसेच त्यांचे चुलत बंधू व आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी या ठिकाणाचा दौरा करत राज्य सरकारला पर्यावरणाचा ऱ्हास केल्यास त्यांची आमच्याशी गाठ असल्याचा इशारा दिला होता. ठाकरे बंधुंसह महायुतीमधील काही स्थानिक आमदारांनीही या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली असून आता सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
Ans: कर्जत येथील साय डोंगर परिसरात प्रस्तावित असलेल्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आणि स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी दौरा केला.
Ans: गुजरातमधील टॉरेंट पॉवर कंपनीचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प साय डोंगर परिसरात प्रस्तावित आहे.
Ans: प्रकल्पासाठी व्यक्त केली आहे.