Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra HSC 12th Result: शिक्षण मंडळाची मोठी घोषणा: राज्यातील १२४ परीक्षा केंद्रांची मान्यता होणार रद्द

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 05, 2025 | 03:42 PM
आता १६ मेपासून होणार सीए परीक्षा

आता १६ मेपासून होणार सीए परीक्षा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा घेतली. यापैकी १२४ केंद्रांवर मोठया प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल मंडळाने घेतली असून, या केंद्रांची मान्यताच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्यावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती. या पथकांव्दारे केलेल्या पाहणीत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आली आहेत अशा १२४ केंद्रांची मान्यता पुढील वर्षीपासून कायमची बंद करण्यात येणार आहे. तसेच या केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने त्याची सखोल चौकशी होणार आहे.

Raju Patil : “नानाची टांग…”, नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केल्यानंतर राजू पाटलांची ट्विटवरून टिका

दरम्यान परीक्षा केंद्रांमध्ये गैरप्रकार होण्यात छत्रपती संभाजी नगर आघाडीवर आहेर येथे तब्ब्ल छत्रपती २१४ प्रकरणे घडली आहेत. तर पुण्यात ४५, नागपूर ३३, मुंबई ९ , कोल्हापूर ७, अमरावती १७, नाशिक १२, लातूर ३७ असे एकूण ३७४ कॉपी प्रकार उघडकीस आले आहेत. तर पुणे विभागात २, छत्रपती संभाजीनगर विभागात ७ व मुंबई विभागात २ अशा ११ कॉपी प्रकरणी परीक्षावेळी गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार यांचे प्रमाण कमी झाले असून, दहावीच्या परीक्षेत गैरप्रकारांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही परीक्षांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक गैरप्रकार झाले आहेत.

Jammu-Kashmir News: कश्मीरमध्ये पुन्हा हल्ल्याची तयारी? मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त, नेमकं चाललयं काय

आज बारावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. या बारावी बोर्ड परीक्षेत राज्यभरातून १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावर्षी २०२५ चा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निकाल १.४९ टक्क्यांनी कमी झाला आहे.

महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे ९ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के आणि लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला. २०२४ मध्येही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के लागला होता. तर मुंबई विभागात सर्वात कमी ९१.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Web Title: Big announcement from the educational board recognition of 124 examination centers in the state will be cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Educational News
  • HSC
  • maharashtra news

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
3

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार
4

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.