Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Mahajan Resign : मनसेला मोठा धक्का! “…तरी निवडणुकीचे तिकिट मिळत नव्हते”, प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

Prakash Mahajan Resign News Marathi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छत्रपती संभाजीनगर येथील प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शनिवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे फेसबुक या समाजमाध्यमावर जाहिर केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 13, 2025 | 02:49 PM
"...तरी निवडणुकीचे तिकिट मिळत नव्हते", प्रकाश महाजन यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

"...तरी निवडणुकीचे तिकिट मिळत नव्हते", प्रकाश महाजन यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Follow Us
Close
Follow Us:

Prakash Mahajan Resign News Marathi : मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांना दिलेले आवाहन प्रकाश महाजन यांना भोवल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ‘माझा केवळ निवडणुकीत वापर केला,’ अशी खंत प्रकाश महाजन यांनी बोलावून दाखवली. तसेच पक्षाकडून कमी अपेक्षा ठेवूनही वाट्याला उपेक्षाच आल्याने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे महाजन यांनी समाजमाध्यावर जाहिर केले.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपणास दिला असा नाही, आज मी तुमच्यासमोर या गोष्टीसाठी आलो आहे कुठेतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसांपासून माझ्या मनात सारखी येत आहे. खरं तर, मी गंगेला बोल लावल त्याचवेळी थांबायसा पाहिजे होतं. खरं तर, मी पहेलगामच्या वेळी थांबायला पाहिजे होतं.पण त्यावेळी मला वाटले की कुठेतरी काहीतरी सुधारणा होईल. वैयक्तिक म्हणाल तर माझ्यापेक्षा अत्यंत कमी आहे. कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला निवडणुकीचा तिकीट मिळण्याची गरज नव्हती. कुठल्या पदाची गरज नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत कधी मला विचारण्यात आलं नाही, विधानसभेच्या वेळी प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. जी जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली, असं प्रकाश महाजन म्हणाले.

Ratnagiri News : प्रीपेड स्मार्ट मीटरवर नागरिकांचा संताप; ठाकरे गटाची महावितरणावर धडक

अमित ठाकरेंना शब्द दिला होता…

माझ्या कामाचं कौतुक नाही, मग माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले.जे माझ्याकडून झालेच नाही, त्याचे प्रायचित्त मला देण्यात आले. खरं म्हणजे मी फक्त अमित ठाकरे यांचा थोडा अपराधी आहे. त्यांना मी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत शब्द दिला होता. असता, अमितजी, मी तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलासोबत देखील काम करेल. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली. मी दिलेला शब्द पाळू शकत नाही. अमितजी, तुम्ही मला समजून घ्याल असं वाटतयं. कधीकधी एखाद्या व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार योग्य ते त्याला मिळत नाही. हा नशिबाचा एक भाग समजतो. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावरती मनापासून प्रेम केलं वेळोवेळी ते सर्वर्थाने माझ्यासाठी धावून आले. त्या सर्व मनसैनिकांचा मी कायमचं ऋणी राहील. पण मला असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे. कुठेतरी या मनोरुग्न अवस्थेतून बाहेर आले पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला आहे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

प्रकाश महाजनांनी राणेंना आव्हान दिले

प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत केलेलं भाष्य आणि त्यांच्या मीडियावरील वावर यावरुन त्यांना साईडलाईन केल्याची चर्चा रंगली होती. या संदर्भात १५ जुलै २०२५ रोजी यांनी एका वृत्तसंस्थेसोबत चर्चा साधली. यावेळी प्रकाश महाजनांनी पक्षात एकटं पडल्याची भावना अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती. भाजप खासदार नारायण राणे यांच्यासोबत टीका टीपण्णी झाली त्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला. पण मनसेतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना जाहीर माझी बाजू घेतली नाही. मी नाराज नाही खिन्न आणि दुःखी आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले होते.

शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई

Web Title: Big blow to mns allegation of neglect spokesperson prakash mahajan says jai maharashtra resign to the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • MNS
  • Prakash Mahajan
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ
1

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज
2

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.