Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण, मनसेच्या टिकेनंतर भाजप नगरसेवकांनी डॉक्टर आणि नर्सची घेतली भेट

डोंबिवली शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सवरील मारहाणीच्या निषेधार्थ भाजपच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट दिली. यावेळी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मनसे नेते राजू पाटील यांच्या टीकेला 'रवी म्हणजे सूर्य' म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले.

  • By विवेक
Updated On: Jul 11, 2026 | 04:01 PM
मनसेच्या टिकेनंतर भाजप नगरसेवकांनी डॉक्टर आणि नर्सची घेतली भेट

मनसेच्या टिकेनंतर भाजप नगरसेवकांनी डॉक्टर आणि नर्सची घेतली भेट

Follow Us
Follow Us:

डोंबिवली : डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या शिष्टमंडळाने शनिवारी रुग्णालयाला भेट देत डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह रुग्णालयातील आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना दीपेश म्हात्रे म्हणाले, “कल्याण-डोंबिवली परिसरात लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटल सुरू व्हावे, यासाठी आम्ही सर्व नगरसेवक पालकमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत.”मनसे नेते राजू पाटील यांनी भाजपचे स्थानिक आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता दीपेश म्हात्रे म्हणाले, “रवी म्हणजे सूर्य. सूर्यावर थुंकायचं नसतं, त्यानंतर काय होतं हे सर्वांना माहिती आहे. जे कधी कधी उगवतात त्यांच्याबद्दल आम्ही जास्त बोलणार नाही. मात्र आम्ही डॉक्टर आणि नर्स यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

Dombivli doctor assault case: ‘एवढं मोठं प्रकरण झालं, रवींद्र चव्हाण होते कुठे?’ डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटलांचा सवाल

या भेटीदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, केडीएफसी गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक दीपेश म्हात्रे तसेच अन्य भाजप पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. मनसे नेते राजू पाटील यांनी शुक्रवारी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन भाजप नेत्यांवर टीका केली होती. त्यानंतर आजभाजप जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने शासकीय रुग्णालयाला भेट देत डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला.

डोंबिवलीतील मानपाडा माणगाव परिसर जलमय; आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून केली पाहणी

Web Title: Dombivli government hospital bjp deepesh mhatre ravi chavan raju patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • BJP
  • Doctors News
  • dombivali news
  • MNS

संबंधित बातम्या

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
1

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीचा दणका! गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाला जाग, मिरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांची डागडुजी सुरू
2

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीचा दणका! गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाला जाग, मिरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांची डागडुजी सुरू

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा
3

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
4

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.