Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं’; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू झालेल्या राजकीय वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतून मनसेप्रमुख राज ठाकरेंना 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत टोला लगावला. तसेच महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले.

  • By विवेक
Updated On: Jul 10, 2026 | 06:27 PM
'मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं'; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

'मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं'; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

Follow Us
Follow Us:
  • मिसिंग लिंक वादावरून फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
  • ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणत विधानसभेतून उपरोधिक टीका
  • ‘महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही’ – फडणवीस
 

राज्यात गेल्या चार दिवसांपासून मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. प्रकल्पावरील दरड दुर्घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतून विरोधकांवर हल्लाबोल करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

मिसिंग लिंक प्रकरणावरून सुरू झालेल्या टीकेदरम्यान फडणवीस म्हणाले, “एकवेळ माझा अपमान करा, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही.” यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करत, “मिसिंग लिंकवर बोलल्याने तुमचा अपमान कसा झाला?” असा सवाल उपस्थित केला होता. तसेच, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून हिंदीत का बोलता?” अशीही टीका त्यांनी केली होती.

‘खोट्या बातम्या पसरवणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान’

विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मिसिंग लिंक संदर्भात ७ हजार कोटी पाण्यात गेले, असे खोटे दावे करणे हा माझा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे.” खोट्या बातम्या पसरवून राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘मिसिंग लिंक’वरून विधान परिषदेत राडा! खोटे आरोप करणारे महाराष्ट्राचे शत्रू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात

‘भाडे टट्टू’पासून ‘भाटक गदर्भ’पर्यंत; फडणवीसांचा पलटवार

राज ठाकरे यांनी हिंदी भाषेवरून केलेल्या टीकेलाही फडणवीसांनी उत्तर दिले. हिंदीत एक वाक्य बोललो, कारण ज्यांना समजायला हवे त्यांच्यासाठी बोललो. पण दुसऱ्यालाच मिरची lलागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “भाडे टट्टू” या शब्दाऐवजी आता “भाटक गदर्भ” हा अधिक सुसंस्कृत शब्द वापरत असल्याचे सांगत, “तरीही कोणाला समजलं नसेल तर सुपारीबाज…” असा टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले, “त्या ठिकाणी मी हिंदीमध्ये बोललो “भाडे के टट्टू” काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं म्हणून… नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे “भाटक गदर्भ” म्हणतो. जर कोणाला समजलं नसेल तर मग “सुपारीबाज”… पण मी तर काही सुपारी बाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती अनेकांना का लागली मला समजलच नाही… अनेक लोकांना ती लागली. बर ते जाऊ द्या आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो आता ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो त्यांच्या दुसऱ्यालाच मिरची लागली आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले पूर्ण भाषा मराठीतच केलं.”

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

‘मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केट राहिलं नसतं’

राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक टिप्पणी करत मुख्यमंत्री म्हणाले, “ते आमचे मित्र आहेत. राजकारणात आम्हाला त्यांच्यापासून काही धोका नाही. पण ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं.”

फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला. मिसिंग लिंक प्रकरणावरून सुरू झालेली राजकीय शाब्दिक चकमक आता अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: Devendra fadnavis raj thackeray mimicry artist missing link row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Assembly Monsoon Session
  • Maharashtra Politics
  • Mumbai Pune Missing Link
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.