Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंच्या टीकेला राम कदमांचा पलटवार; मिसिंग लिंक वादावर भाजप-मनसे आमनेसामने

मिसिंग लिंक दुर्घटनेवरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीसांच्या कामांचे कौतुक करत विरोधकांकडून बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jul 09, 2026 | 05:19 PM
राज ठाकरेंच्या टीकेला राम कदमांचा पलटवार; मिसिंग लिंक वादावर भाजप-मनसे आमनेसामने

राज ठाकरेंच्या टीकेला राम कदमांचा पलटवार; मिसिंग लिंक वादावर भाजप-मनसे आमनेसामने

Follow Us
Follow Us:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार, 9 जुलै) रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त टीका टीका केली. मिसिंग लिंक दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या विधानांवरून राज ठाकरे यांनी आज चांगल्याच शब्दांत समाचार घेतला. यावरून आता भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून भाजप आमदार राम कदम यांनी यावरून राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

राम कदमांचे राज ठाकरेंवर टीकास्त्र

राम कदम यावेळी म्हणाले, “आमिर खानच्या लग्नाला गेल्यावर आपण मराठी किती बोललात? मग मुख्यमंत्री यांनी भाषणात दोन ओळी हिंदीत बोललं तर काय झालं? मराठीचा आदर कायमच आहे. मुख्यमंत्री देवेन्द्रजी यांची ओळखच इन्फ्रामॅन अशी झाली आहे. धडाधड सर्वत्र काम सुरु आहेत. याची धास्ती विरोधकांना आहे. त्यामुळेच विरोधकांकडून टक्केवारीच्या गोष्टी करून बदनाम केलं जात आहे. रामाच्या अस्तित्वावर कायम काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. त्यांचा तो अजेंडा आहे. मिसिंग लिन्कवरचीडारद हा अपघात होता. लोक चांगल्या कामाबद्दल बोलत नाहीत. मात्र, त्रुटींबद्दल बोलतात,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

‘संजय राऊत हे तर शरद पवारांचेच शिष्य’, एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर गृहराज्यमंत्र्यांचा घणाघात; ‘पवार NDA मध्ये आले तर…

काय म्हणाले होते राज ठाकरे?

फडणवीसांवर टीका राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत भशान झालं. मिसिंग लिंक उत्तम दर्जाचं वैगेरे बोलले. टीका करणार्यांना बघून घेऊ म्हणतात, मुख्यमंत्री आहे ना तू? मग हिंदीमधून सुरु झाले. कोणासाठी हिंदी बोलला? विधानसभा महाराष्ट्राची. कदाचित आपल्याच पक्षातील वरच्याना सांगायचे आहे बघून घेईल,” असे ते म्हणाले.

“मिसिंग लिंकवर खांब कोसळला, पाणी आलं. म्हणे त्याच राजकारण करू नका. अरे वा. त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होतात. दुसऱ्याचं सरकार असताना तुम्ही काय करत होतात. त्यावेळी आंदोलन झाली ते राजकारण नव्हतं? स्वतःच्या अंगाशी आल्यावर ते राजकारण. असं कसं होईल? म्हणे, एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा.. लोक त्या मिसिंग लिंकवर बोलतात. महाराष्ट्राचा कुठे अपमान करतात. यांना केंद्र सरकारची सवय लागली आहे. केंद्राच्या कोणत्या गोष्टीवर बोललं तर तुम्ही देशद्रोही.” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

मिसिंग लिंक दुर्घटनेनंतर राज्याच्या राजकीय वातावरणात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी मोठ्या प्रमाणात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केला. त्यानंतर फडणवीसांनीं पावसाळी अधिवेशनात याबाबत बोलताना उलट विरोधकांवरच निशाणा साधत ‘महाराष्ट्राला बदनाम करू नका‘ असे वक्तव्य केले. यावरून आता मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या असून राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Ram kadam reaction on raj thackeray missing link devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Missing Link Project
  • raj thackeray
  • Ram Kadam

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?
1

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक
2

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक

Niti Aayog : नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली देशात अव्वल; ‘या’ गोष्टीत आगेकूच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा
3

Niti Aayog : नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली देशात अव्वल; ‘या’ गोष्टीत आगेकूच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
4

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.