मुंबई – मुंबई उपनगरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आता रेल्वे प्रवासात देखील जीवाची हमी नसल्याचं या घटनेवरुन समोर येत आहे. जयपूर ते मुंबई पॅसेजर एक्सप्रेसमध्ये (jaipur to mumbai passenger express) गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या गोळीबारात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये एका पोलिसांचा देखील मृत्यू झाला आहे.पालघर ते विरारदरम्यान (Palghar to viriar0 हा गोळीबार झाला आहे. हवेत गोळीबार केल्याची माहीत समोर येत आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या घटनेचा जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांकडून तपास सुरु आहे. या घटनेमुळं एक खळबळ माजली असून, रेल्वेत ही काहीही होऊ शकते, अशी आता प्रवाशांची भावना आहे. (big breaking firing in jaipur to mumbai passenger express four dead including policemen)
An RPF constable opened fire inside a moving Jaipur Express Train after it crossed Palghar Station. He shot one RPF ASI and three other passengers and jumped out of the train near Dahisar Station. The accused constable has been detained along with his weapon. More details…
— ANI (@ANI) July 31, 2023
RPF च्या कॉन्सटेबलकडून गोळीबार
दरम्यान, रेल्वेत गोळीबार झाला आहे. हा गोळीबार एका चैतन्य नावाच्या कॉन्सटेबलकडून गोळीबार झाल्याची माहीत समोर येत आहे. बोगी पाचमध्ये गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका पोलिसांचा देखील मृत्यू झाला आहे. बी – ५ या बोगीमध्ये गोळीबार झाला आहे. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या चैतन्य नावाच्या कॉन्सटेबलला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरु आहे. पोलीस कसून चौकशी गोळीबार करणाऱ्या कॉन्सटेबलची करताहेत. मृत्य झालेल्या कॉन्सटबेलचे नाव एएसआय टिकाराम मीना असं आहे (ASI TIKARAM MEENA- DEAD)
Four people were shot dead in the firing incident inside the Jaipur Express train (12956). The accused has been arrested.
Visuals from Mumbai Central Railway Station pic.twitter.com/RgNjYOTbMD
— ANI (@ANI) July 31, 2023
वादातून झाला गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य आणि त्याचा कॉन्सटेबल सहकारी असे दोनजण रेल्वेत एकाच डब्यात बसले होते. मात्र काही कारणारुन या दोघांत वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, याचे रुपांतर भांडणात झाले. आणि चैतन्य या कॉन्सटेबल स्व;ताकडील पिस्तुल काढत हवेत गोळीबार केला. यानंतर झटापट झाली. या झटापटीत एका पोलिसांसह चौघांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास रेल्वे पोलिस करताहेत. ही घटना सकाळी साडे पाच वाजता घडली आहे.