Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा केडीएमसीला इशारा

डंपिंग ग्राऊंडवर थेट पोकलन-डंपरच्या माध्यमातून कचरा उचलला जातोय आणि दुसरीकडे जशाच्या तसा टाकला जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 18, 2023 | 04:57 PM
भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा केडीएमसीला इशारा
Follow Us
Close
Follow Us:
कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर डंपिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून कल्याण शहर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्याचे काम सध्या सुरू असून शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून कचरा उचलला न गेल्यास उग्र आंदोलनाचा इशारा भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी दिला आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर डंपिंग ग्राऊंडवर सुरू असणाऱ्या या कामाची स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी आज पाहणी केली. त्यावेळी कोणतीही शास्त्रोक्त प्रक्रिया न करता हा कचरा उचलला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कल्याण पश्चिमेतील वाडेघर डंपिंग ग्राउंड हे कल्याण पश्चिमेतील नागरिकांसह गेल्या अनेक वर्षांपासून केडीएमसीच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासाठी नेहमीच अडचणीचा विषय ठरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या डंपिंगवर कचरा टाकणे बंद झाले असून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचा हा डोंगर हटवण्यात येईल असे केडीएमसी प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून कचरा उचलण्याच्या आश्वासनाचा बहुधा केडीएमसी प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे डंपिंग ग्राउंडच्या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दुर्गंधीची समस्या भेडसावू लागल्याचे भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी सांगितले. जर अशाच प्रकारे कचरा उचलायचा होता तर मग इतके वर्षे हे काम का नाही झाले असा संतप्त सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.
डंपिंग ग्राऊंडवर थेट पोकलन-डंपरच्या माध्यमातून कचरा उचलला जातोय आणि दुसरीकडे जशाच्या तसा टाकला जात आहे. परिणामी डंपिंग ग्राउंड शेजारील भागातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तर हा कचरा ज्याठिकाणी टाकला जातोय तिथल्या लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करूनच हा कचरा उचलावा अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.

Web Title: Bjp city president varun patils warning to kdmc maharashtra political party maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2023 | 04:57 PM

Topics:  

  • kalyan dombivli muncipal corporation
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ
1

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ

Elon Musk ला महाराष्ट्राची भुरळ! Starlink सोबत राज्य सरकारची पार्टनरशिप, अति दुर्गम भागातही इंटेटरनेट सेवा पोहोचणार
2

Elon Musk ला महाराष्ट्राची भुरळ! Starlink सोबत राज्य सरकारची पार्टनरशिप, अति दुर्गम भागातही इंटेटरनेट सेवा पोहोचणार

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!
3

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”;  राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
4

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.