ॲड.आशीष गिरी यांचा नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीत जाहिर पक्ष प्रवेश ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले आहे. ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा राम राम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विरू वाघमारे उपस्थित होते.