
निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिंदेंना मोठा धक्का! (Photo Credit- X)
नेमकी नाराजी कशामुळे?
मिळालेल्या माहितीनुसार, अंतर्गत वादातून हे राजीनामा नाट्य रंगले आहे. प्रभाग क्रमांक ३ (मनोरमानगर) मधील शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. आपल्या खास कार्यकर्त्यावर झालेल्या या कारवाईमुळे मीनाक्षी शिंदे कमालीच्या नाराज होत्या आणि याच नाराजीतून त्यांनी महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला.
पत्रात काय म्हटले आहे?
मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, “सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मी या पदावर काम करण्यास इच्छुक नाही.” निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असतानाच एवढ्या मोठ्या नेत्याने पद सोडल्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ठाण्याचे राजकारण ढवळून निघाले
ठाणे महानगरपालिका ही एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. तिथे पुन्हा भगवा फडकवण्यासाठी महायुतीने पूर्ण ताकद लावली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंची शिवसेना हा गड सर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा वेळी मीनाक्षी शिंदे यांची नाराजी पक्षाला महाग पडू शकते.
पुढील पाऊल काय?
मीनाक्षी शिंदे केवळ पदाचा राजीनामा देऊन शांत बसणार की त्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करून निवडणुकीत शिंदें समोर आव्हान उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.