Maharashtra CM: भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय! अखेर देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
Devendra Fadnavis: राज्यात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. तर आज विधानभवनात भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस होणार हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान आज विधानभवनात भाजपच्या गटनेत्याची निवड प्रक्रिया पार पडली. त्याआधी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर केंद्रिय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वात कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत संपूर्ण राज्यात चर्चा होत्या, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांची नावे आली. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना मागे टाकत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर आपले नाव कोरले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचे कर्करोगाने निधन, पत्नी आणि मुलींवर कोसळला दुःखाचा डोंगर!
राज्यात विधनसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व य़श मिळवत यशाचा झेंडा फडकावला.132 जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने हे अभूतपूर्व यश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्राप्त केले आहे. राज्यात महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. पण हा विजय देवेंद्र फडणवीसांसाठी सोपा नव्हता.लोकसभेतील पराभवानंतर उपमुख्यमंत्रीपदावर असतानाही फडणवीसांच्या माथी या पराभवाचे खापर फोडण्यात आले. अनेकदा त्यांना अपमानाला सामोरे जावे लागले. केंद्रीय नेतृत्त्वाच्या गुडबुकमध्ये असलेले फडणवीसांवर गंभीर आरोप होऊ लागले. विधानसभा निवडणुकीपूर्वीच फडणवीस यांना दिल्लीला पाठवायचे, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे की केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे, अशी चर्चाही सुरू झाली होती.
पण पडणवीसांनी हार न मानता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वेगाने हालचाली वाढवल्या. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत सातत्याने बैठका घेतल्या आणि आरएसएसलाही निवडणुकीत सहभागी करून घेतले. इतकेच नव्हे तर निवडणुकीतील प्रत्येक छोट्या मोठ्या बैठकांपासून मोठमोठ्या सभांपर्यंत फडणवीस आणि भाजपने मायक्रो नियोजन केले होते. निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाजप मैदानात काम करत होती.अखेर फडणवीसांच्या मेहनत फळाला आली आणि विधानसभा निवडणुकीत भाजप अभूतपूर्व बहुमताने विजयी झाली.
भाजीच्या सालांनी बनवा सर्वात सशक्त Fertilizer, घरातील गार्डन कायम दिसेल
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र आज भाजपच्या बैठकीनंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली होती. दिल्लीत झालेल्या बैठकीत फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे म्हटले जात होते. आज महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.