Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘युतीमध्ये भाजप मित्रपक्षांना अपेक्षित जागा देत नाहीत’; आरोपांवर रामदास आठवले स्पष्टचं बोलले

भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय आठवले गट) यांनी देखील तयारी सुरु केली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावर्षी अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी केली रामदास आठवले यांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 18, 2024 | 06:08 PM
‘युतीमध्ये भाजप मित्रपक्षांना अपेक्षित जागा देत नाहीत’; आरोपांवर रामदास आठवले स्पष्टचं बोलले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या असून आता विधानसभा निवडणुकांची तयारी केली जात आहे. भाजपसह त्यांचे मित्रपक्ष देखील विधानसभेच्या निवडणुकीची मोट बांधण्यास निघाले आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय आठवले गट) यांनी देखील तयारी सुरु केली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावर्षी अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी केली रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचबरोबर भाजपवर केल्या जाणाऱ्या टीकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अल्पसंख्याकांमधील नाराजी दूर करू

यावेळी रामदास आठवले म्हणाले, “अलीकडेच आमची उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागावाटपावर चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की लोकसभा निवडणुकीत आरपीआयला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी आठ ते दहा जागा मिळायला हव्यात. इंडिया आघाडीवाल्या लोकांच्या अपप्रचारामुळे आम्हाला लोकसभा निवडणुकीत अपयश आलं असली तरी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्याची कसर भरून काढू. इंडिया आघाडीने देशात आणि राज्यात संविधानाबाबत अफवा पसरवली ज्यामुळे आम्हाला फटका बसला. परंतु, विधानसभा निवडणुकीत आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ. दलित आणि अल्पसंख्याकांमधील नाराजी दूर करू आणि त्यांना आमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू,” असा विश्वास देखील यांनी व्यक्त केला.

मित्रपक्षांना अपेक्षित जागा देत नाहीत का?

भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रपक्षांना अपेक्षित जागा देत नाही, असा आरोप केला जातो यावर काय सांगाल? असा प्रश्न माध्यमांनी केला. यावर रामदास आठवले म्हणाले, “लोकसभेला भाजपाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाला १५ जागा आणि अजित पवारांच्या पक्षाला चार जागा दिल्या होत्या. आमच्या पक्षाला त्यावेळी एकही जागा मिळाली नाही. कारण मी एका मतदारसंघात अडकून राहिलो तर राज्यभर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायला मला वेळ देता आला नसता. त्यामुळे आम्ही वेगळे निर्णय घेतले. मी प्रचारात उतरलो, आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात उतरले आणि आम्ही १७ जागा निवडून आणल्या. या 17 जागा निवडून आणण्यात आरपीआयचा मोठा वाटा आहे,” असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Web Title: Bjp does not give expected space to allies in coalition ramdas athawale spoke on allegations nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2024 | 06:08 PM

Topics:  

  • Central Minister Ramdas Athawale
  • Ramdas Athawale
  • Vidhansabha Elections 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.