छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी उपोषण स्थगित करत आहे. पण येत्या 13 ऑगस्टपर्यंत मी सरकारला वेळ देतो, तोपर्यंत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशातचं भाजप आमदाराने मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आली आहे.
भाजप आमदार नारायण कुचे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबाबत ही भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपमधील इतर आमदारांवर निशाणा साधला होता, आता भाजप आमदार जरांगे पाटलांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांणा उधाण आलं आहे.