manoj jarange patil claim OBCs attempt to create riots in Maratha reservation movement
Maratha andolan riots : मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र या मराठा आंदोलनामध्ये दंगली करण्याचा डाव असल्याचा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यारुन ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे यांनी आरोप फेटाळत लावून जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मराठा समाजाला आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर दंगली होण्याची शक्यता वर्तवली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करायचे आहे. या मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला आहे. लोकांना बेजार करुन टाकलंय. सरकार गोरगरीब जनतेला, मराठ्यांना, अठरापगड जातीच्या लोकांना संधी देत नाही, दलित मुस्लीमांनाही न्याय द्यायचा नाही. देवेंद्र फडणवीसांनी नवीनच सुरु केलंय, मी ओबीसीसाठी लढणार, मराठ्यासाठी कोण लढणार. हे फक्त भांडणं लावायचं कायम करतातय. मराठ्याच्या विरोधात दंगल करा, असं ओबीसींच्या नेत्यांचे कान भरले आहे. दंगल झाली ना तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला तुम्ही जबाबदार असाल, आता मोकळीक नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावरुन ओबीसी नेत्यांनी आरोप फेटाळत जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे. तायडे म्हणाले की, “मनोज जरांगे हे मानसिक तणावातून आरोप करत आहे. कदाचित मनोज जरांगे हेच असले कृत्य करत असावे, त्यामुळे त्यांनी ही भावना व्यक्त केली असावी. खरंतर मनोज जरांगे हेच महाराष्ट्रात मराठा व मराठेत्तर वाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका बबनराव तायडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे बबनराव तायडे यांनी राज्यातील ओबीसी समाजाची राजकीय परिस्थिती सांगितली. ते म्हणाले की, “ओबीसीचे शंभर आमदार निवडून आले, त्यामुळे ओबीसींना सरकारमध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळले. त्यामुळे ओबीसी पालकमंत्री अधिक आहे. मात्र कोणत्या समाजाचे नेतृत्व संपावे, ही आमची भावना नसल्याचेही बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं. तसेच मी मनोज जरांगे यांच्या सोबत खुल्या व्यासपीठावर कुठेही चर्चा करायला तयार आहे,” असे थेट आव्हान ओबीसी नेते बबनराव तायडे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.