Nitesh Rane is aggressive as Rahul Gandhi pays tribute to Chhatrapati Shivaji Maharaj
सिंधुदूर्ग : भाजपचे आमदार व मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी हिंदूत्ववादी भूमिका मांडली तसेच हिंदू समाजाने त्यांना निवडून दिले आहे तर त्यामुळे हिंदूना पहिले प्राधान्य दिले जाईल या आशयचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी त्यांची भूमिका मांडताना त्यांचे हिंदूत्ववादी विचार पुन्हा एकदा प्रकर्षाने मांडले आहेत. यावेळी नितेश राणे म्हणाले की, “मी या परिषदेत हिंदूत्ववादी कार्यकर्ता म्हणून आलोय. मी मंत्री आमदार आहे पण त्याही पेक्षा मी एक हिंदू आहे. भारत हा हिंदू राष्ट्रच आहे. या देशात ९० टक्के हिंदू लोक आहेत, मग आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवायला नको, आपला देश हिंदू राष्ट्रच आहे. आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी राष्ट्र आहे. पहिला सन्मान हिंदूंचाच होईल. हिंदू समाजासाठी ज्या ज्या गोष्टी या जिल्ह्यात हव्यात त्या देण्यात येतील. पहिल्यांदा सर्वच हिंदू होते. आपल्या देशावर जे इस्लामिक हल्ले झाले त्यावेळी मंदिरांवर हल्ले केले. हिंदू मंदिरे ताब्यात घेतली. आज या जिहादी आहेत, त्यांना धडा शिकवावा,” असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे नितेश राणे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या संविधानात सेक्युलर हा शब्द नाही. मदिरांद्वरे हिंदूंचा प्रसार अधिक होणे गरजेचे आहे. लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड काही प्रकरणे होती, सकल हिंदू समाज म्हणून आम्ही तिथे गेलो. आज आपल्या प्रमुख धर्मस्थळे यावर अतिक्रमणे सुरू झालीत. हे जिहादी आपल्याच मंदिरांच्या जमिनीवर हक्क दाखवायचा आहे. आपले राष्ट्र इस्लामी राष्ट्र म्हणून करायचे आहे. त्यांना भूक, मैत्री, कुटुंब महत्त्वाचे नसते. त्यावेळी त्यांना धर्म महत्त्वाचा असतो. म्हणून आपल्या मंदिराकडे या दृष्टी देता नये. मुस्लिम आणि काफिल हे एक आहे,” असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
दिल्ली विधानसभेच्या निकालाबाबत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “कोकणात आपली एकजूट हवी. आपल्या बरोबर आम्ही १०० टक्के आहोत. हिंदू समाजाने हे सरकार निवडून आणले आहे. त्यामुळे हिंदूना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. आता प्रिन्सिपॉल किंवा हेडमास्तर बदलला आहे. झाराप घटना प्रकरणी त्या स्टॉलवाल्यास नोटीस देऊन ते सील करण्याचे आदेश दिले आहेत. मालवण शिवराजेश्वर मंदिर प्रश्न सरकार म्हणून सोडविला जाईल. योग्य तो निधी देण्यात येईल. पालकमंत्री म्हणून मी तालुकानिहाय दौरे करणार, आपण आपल्या गरजा मला सांगा. आम्ही सर्वजण हिंदू समाजबरोबर आहे,” असे विधान मंत्री व भाजप नेते नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.