Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्यान परिसरात दारुड्यांचा वावर; आमदार शंकर जगतापांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

उद्यानातील तुटलेले झोके, पाण्याअभावी सुकलेली झाडे, उद्यान परिसरात दारुड्याचा वावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 10, 2025 | 05:25 PM
उद्यान परिसरात दारुड्यांचा वावर; आमदार शंकर जगतापांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

उद्यान परिसरात दारुड्यांचा वावर; आमदार शंकर जगतापांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : सांगवी परिसरातील शिवसृष्टी उद्यान (तानाजीराव शितोळे उद्यान), छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि सावतामाळी या उद्यानांना आमदार शंकर जगताप यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. उद्यानातील तुटलेले झोके, पाण्याअभावी सुकलेली झाडे, उद्यान परिसरात दारुड्याचा वावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, प्रशांत शितोळे, सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे, सारिका भंडलकर, माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे, गणेश सहकारी बॅक संचालक प्रमोद ठाकर, हेमंत निगुडकर, महानगर बॅंक संचालक नितीन खोडदे, शारूख सय्यद, अमोल गायकवाड, वैभव ढोरे, विशाल सोमवंशी, प्रदीप झांजुर्णे, अमित गवळी, योगेश मोहारे, विनायक शिंदे, सुजित पोंगडे, गणेश ढोरे आदी उपस्थित होते.

उद्यान विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आमदार जगताप म्हणाले की, शाळांना सुटी आहे. मोठया संख्येने बाल गोपाळ उद्यानात खेळण्यासाठी आणि बागडण्यासाठी येतात. मुलांना सुरक्षितपणे खेळण्यासाठी तातडीने खेळण्याची दुरुस्ती करा. नादुरुस्त आणि खराब खेळण्यामुळे अपघात होऊ शकतो, त्यामुळे ती खेळणी काढून टाका. पाण्याअभावी झाडे व हिरवळ सुकणार नाही याची दक्षता घ्या. सुरक्षारक्षक नेमून उद्यान परिसरात दारुड्याचा बंदोबस्त करा, अशा सक्त सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

आमदार शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा रोष पाहून उपस्थित पदाधिकारी, माजी नगरसेवक, नागरिक आवाक झाले. यानंतर तरी उद्यान विभागाच्या कामकाजात योग्य ती सुधारणा होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bjp mla shankar jagtap has taken the parks department officials to task

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • BJP city president Shankar Jagtap
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • pune news

संबंधित बातम्या

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार
1

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली
2

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
3

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार
4

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.