Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मुख्यमंत्री असताना मराठी…”

आपला पक्ष वाढवण्यासाठी, अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पक्षाच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांना सभा घ्याव्याच लागतील, असे खासदार अनिल बोंडे म्हणाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2025 | 03:59 PM
खासदार अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, "मुख्यमंत्री असताना मराठी..."

खासदार अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, "मुख्यमंत्री असताना मराठी..."

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर: हिंदी भाषेविरोधात राज्यभरात वाढता विरोध पाहता राज्य सरकराने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हिंदी भाषा अनिवार्य करावी की न करावी यासाठी एक समिती नेमली जाईल, आणि या समितीच्या अहवालानुसार त्रिभाषा सूत्र ठरवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.  दरम्यान खासदार अनिल बोंडे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

खासदार अनिल बोंडे यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. खासदार अनिल बोंडे म्हणाले, ” त्रिसूत्रीत तीन भाषा जाहीर कराव्या असा माशेलकर समितीचा अहवाल होता. माशेलकर समितीचा अहवाल रद्द करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उद्धव ठाकरे जो काही खटाटोप करत होते ते आपले पाप लपवण्यासाठी करत होते.”

“उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठी मराठी म्हणत मुख्यमंत्री असताना मराठी माणसाचा घात केला. आपले पाप झाकण्याचा प्रयत्न असेल तर उबाठावर चित्रपट निघू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो निर्णय रद्द केला त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे,” असे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.

स्वतःचं पाप झाकण्यासाठी खटाटोप करावी लागते. यावर चित्रपट काढायला काय हरकत आहे, असा सवाल अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे. आपला पक्ष वाढवण्यासाठी, अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पक्षाच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांना सभा घ्याव्याच लागतील, असे खासदार अनिल बोंडे म्हणाले आहेत.

अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द

 

हिंदी भाषेविरोधात राज्यभरात वाढता विरोध पाहता राज्य सरकराने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हिंदी भाषा अनिवार्य करावी की न करावी यासाठी एक समिती नेमली जाईल, आणि या समितीच्या अहवालानुसार त्रिभाषा सूत्र ठरवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारच्या निर्णयानंतर विरोधक, साहित्यीक, कलाकार आणि सामान्य जनतेतूनही विरोध केला जात होता. लोकभावना आणि विरोधासमोर सरकारला झुकावं लागल्याचं दिसून येत आहे.

Breaking News : अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द, लोकभावनेपुढे सरकारची नरमाईची भूमिका

हिंदी सक्तीच्या निर्णयाला रद्द करतानाची घोषणा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हा निर्णय ठाकरे सरकारच्या कार्यकाळात कसा मंजूर झाला होता हे सांगायचं मात्र विसरले नाहीत. त्यांनी स्पष्ट केलं की, हिंदी सक्तीची भाषा राहणार आहे. त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीसाठी विशेष समिती गठीत केली जाणार असून, ती कोणत्या इयत्तेपासून लागू करायची यावर निर्णय घेताला जाईल. या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Bjp mp anil bonde criticizes to uddha thackeray arathi language nagpur marathi politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Marathi language Compulsory
  • Nagpur
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
1

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
2

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून
3

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
4

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.