
BJP needs an alliance for the mayoral post in the Sangli, Miraj and Kupwad Municipal Corporation
Sangli News : सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापलिका निवडणुकीत (Sangli News) भाजपला सर्वाधिक ३९ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजपची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे, मात्र हे काठावरील बहुमत पुढील पाच वर्षे भाजपला काठेरी मुकुटाप्रमाणे असणार आहे, बहुमत मिळाले असले तरी भाजपला आता महापौर पदासाठी आणखी एका मताची गरज लागणार आहे, त्यासाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला यावेळी जास्त जागा मिळतील असा विश्वास होता, कारण गत निवडणुकीत भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या, यावेळी जेष्ठ नेत्या जयश्री पाटील, कॉंगेसचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले पृथ्वीराज पाटील, मनोज सरगर अशी तगडी टीम फोडण्यात भाजपला यश आलेले होते, त्यामुळे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी ५५ ते ६० जागांचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्ष वाढ होण्यापेक्षा संख्याबळात घट झाली, आता मिलेली सत्ता ही भाजपसाठी काटेरी मुकुट बनली आहे.
बहुमत मिळाले पण महापौर पदासाठी इतरांची गरज
निवडणुकीत भाजपला एकूण ३९ जागा मिळाल्या आहेत, तर कॉंग्रेस १८, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला १६, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ३ आणि शिवेसेना एकनाथ शिंदे यांना २ असे या अघोषित आघाडीला ३९ जागा मिळाल्या आहेत, जनतेने ३९-३९ असा कौल दिल्याने सत्ता स्थापन करण्यासठी एका नगरसेवकाची गरज आहे, भाजप मधून आता कोणी फुटण्याची शक्यता नाही, त्यामुळे सत्ता भाजपची येणार, मात्र आता सोबत घ्यायचे कोणाला ?, हा प्रश्न भाजपपुढे आहे, इकडे आड- तिकडे विहीर अशी परिस्थिती भाजपची झालेली आहे.
हे देखील वाचा : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर मावळात NCPला धक्का; आमदार शेळके यांचे खंदे समर्थक प्रशांत भागवत थेट भाजपमध्ये
स्थायी समितीसाठीही करावी लागणार सर्कस
स्थायी समिती ही महापलिकेत अत्यंत महत्वाची समिती असते, ज्याद्वारे मनपाचे आर्थिक निर्णय घेतले जातात, तसेच धोरणांची अमलबजावणी, प्रशासकीय देखरेख ठेवली जाते, या समितीत संख्याबळानुसार सदस्यसंख्या असते, आता भाजपचे संख्याबळ ३९ असल्याने ८ सदस्य संख्या मिळेल, दुसऱ्या क्रमांकाला कॉंग्रेसचे संख्याबळ आहे १८, त्यामुळे त्यांना ४ सदस्य मिळतील, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार यांचे १६ संख्याबळ असल्याने त्यांना ३ सदस्य मिळतील, त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे ३ संख्याबळ आहे, त्यांना एक सदस्य मिळेल, शिवसेनेकडे २ संख्याबळ असल्याने त्यांना स्थायी समिती सदस्यत्व मिळणार नाही, पुन्हा ८ विरुद्ध ८ अशी लढत होतील, चिट्टीवर स्थायी स्थायी समितीचा सभापती निवडणे भाजपला धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे आता भाजपपुढे पुन्हा संकट निर्माण झाले आहे.
बहुमत असून झाला होता राष्ट्रवादीचा महापौर
सन २०१८ च्या निवडणुकीत भाजपला ४१ इतके संख्याबळ मिळाले, मात्र २०२१ मध्ये महापौर पदाचे आरक्षण बदलल्यावर भाजपचे ७ नगरसेवक फुटले, दोन गैरहजर राहिले, परिणामी बहुमत असून देखील कॉंग्रेसच्या साथीने जयंत पाटील यांनी दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौर पदावर बसवत भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला होता, त्यामुळे आता पुन्हा भाजपला असा धोका होऊ शकत आल्याने मोठे संख्याबळ असणारा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सोबतीला घ्यावा लागेल , मात्र तसे झाले तर १६ नगरसेवकांना सांभाळणे भाजपला अडचणीचे ठरणार आहे, प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मनधरणी करण्याची वेळ भाजपवर येणार आहे.
हे देखील वाचा : मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा
“राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत अत्यंत ताकदीने लढत दिली. आम्ही १६ जागा जिंकल्या. आणखी आठ जागा अगदी कमी मतांनी गमावल्या आहे. आमचे विजयी उमेदवार पुणे, बारामतीच्या धर्तीवर विकासासाठी काम करतील. महापालिकेतील सध्याची जी स्थिती आहे, ती पाहता सगळ्या घडामोडींकडे आमचे लक्ष आहे. भाजप विरोधकांची संख्या ३९ आहे. आमच्याकडेही ३९ आहेत. त्यामुळे सत्ता डाव अजून ओपन आहे.”, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे