आता भाजप दिवाळीदरम्यान एका मोठ्या दीपोत्सवाचे आयोजन करत आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी येथील जांबोरी मैदानावर भाजपने 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने कोरोना साथीच्या आजाराशी निगडीत सर्व निर्बंध उठवले आहेत आणि दोन वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात सण उत्साहात साजरे करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. बीएमसी निवडणुकीपूर्वी, भाजप ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वरळी मतदारसंघाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. वरळी परिसर शिवसेना समर्थकांसाठी ओळखला जातो आणि आदित्य ठाकरे 2019 मध्ये च मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन मंत्री म्हणून शपथ घेतली.
दीपोत्सवाच्या कार्यक्रमाबाबत भाजप नेत्यांनी सांगितले, ‘बीएमसी निवडणूक जवळ आली आहे आणि आमचे लक्ष वरळी भागावर आहे. आम्ही तिथल्या लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि यासाठी तिथल्या लोकांसोबत दिवाळी साजरी करणे हा एक कार्यक्रम आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मराठी लोकसंख्या असल्याने, दीपोत्सवाच्या कार्यक्रमात सादरीकरणासाठी आम्ही अनेक मराठी कलाकारांना आमंत्रित करणार आहे.