कुंडलवाडी नगर परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला (फोटो - सोशल मीडिया)
कल्याण गायकवाड : कुंडलवाडी : कुंडलवाडी नगर परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा कमळ फुल्ले असून नागराध्यक्षपादासाठी भाजपच्या सौं प्रेरणाताई गजानन कोटलावार या 4650 मते घेऊन जनतेतून निवडून आल्या असून भाजपच्या चौदा उमेदवारांनी निवडणूक जिंकून आपले बहुमत सिद्ध केले. राष्ट्रवादी काँगेसचे 2, काँग्रेसचे दोन तर अपक्ष दोन उमेदवारांनी आपलं अस्तित्व दाखवून दिले. विशेषता पक्षाच्या उमेदवारपेक्षा अपक्ष डॉ. प्रशांत सब्बनवार यांची टीव्ही तर संजय शंकर गोनेलवार यांच्या बॅट या निशाणीची निवडणुकीच्या सुरुवातीपासून नागरिकांत जोरदार चर्चा होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे डॉ. विठ्ठल कुडमुलवार यांचा निसटता पराभव झाला असून केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे मुख्तार खाजमिया शेख व यासिन बानू अहेमद हुसेन या दोन उमेदवारांनी ही निवडणूक जिंकली. भाजपच्या जुन्या उमेदवारांना डावलून नवख्या उमेदवाराला पक्ष श्रेष्ठीनी तिकीट दिल्याने भाजपचे जुने कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले. परिणामता काही भाजपाला ऐन निवडणुकीत रामराम ठोकत राष्ट्रवादीचे घड्याळ हाताशी बांधल्याने चांगली वेळ येईल अशी मनीषा बाळगली. परंतु हुशार मतदारांनी योग्य निर्णय घेऊन मतदान केले.
हे देखील वाचा : नगरपालिकेची ‘सत्वपरीक्षा! आमदार चव्हाण, चिखलीकर अन् कोहळीकर झाले पास
शिवसेना ठाकरे सेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. आरंभी भाजपात गट तट झाले. परंतु भाजपात राहिलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढत दिली आणि कुंडलवाडी पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी विपीन पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक मोरे यांच्यासह सर्व कार्मचारी यांनी अत्यंत नियोजनबद्ध कार्य केले तर पोलीस ठाणे प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे (सपोनी) मांजरमकर (पोलिस उपनिरीक्षक) यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, कार्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
कुंडलवाडीत भारतीय जनता पार्टीचे नगरध्यक्ष प्रेरणा गजानन कोटलावार यांची प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल तसेच
विजयी नगरसेवक यांचे अभिनंदन करताना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक राजेंद्र रेड्डी तोटावाड, प्रकाश भंडारे मिनकीकर तालुका सरचिटणीस भाजपा बिलोली, डॉ. लखमपुरे साईनाथ सावकार, भिम पोतनकर, साईनाथ शेट्टीवार, सुर्यकांत पाटील हरनाळीकर व आदीजण उपस्थित होते.
हे देखील वाचा : दिल्लीकरांचा कोंडतोय श्वास; भारताला वायू प्रदुषण नियंत्रित करणाऱ्या मॉडेलची गरज
भाजपाचा दणदणीत विजय – अशोक चव्हाण
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला दणदणीत विजय हा महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत विकसित भारत व विकसित महाराष्ट्र या भाजपच्या संकल्पाला दिलेला स्पष्ट कौल आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. भाजप सरकारच्या विकासकामांच्या धडाक्याला मतदारांनी दिलेला हा अनुकूल प्रतिसाद असल्याचेही त्यांनी नमूद केले. या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे क्रमांक एक राजकीय पक्ष ठरला असून, सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निक आले आहेत. जिल्ह्यात भाजपचे अधि तीन नगराध्यक्ष विजयी झाले अम सहयोगी नगराध्यक्षांच्या माध्यमातून संख्येत आणखी वाढ आहे.






