Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपुरात भाजपला खिंडार; वसंतराव देशमुख करणार शरद पवार गटात प्रवेश

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (29 ऑगस्ट)  पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात मोठी बैठक पार पडली. या बैठकीत वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वसंतराव देशमुख लवकरच आपल्या कार्यकर्त्यांसह हातात तुतारी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.वसंतराव देशमुखांमुळे पंढरपुरमध्ये शरद पवारांची ताकद वाढणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 30, 2024 | 10:31 AM
पंढरपुरात भाजपला खिंडार; वसंतराव देशमुख करणार शरद पवार गटात प्रवेश
Follow Us
Follow Us:

मुंबई: विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठमोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी मतदारसंघात बैठका, सभा घेण्यास सुरूवात केली आहे.तिकीट मिळवण्यासाठी  आजी-माजी आमदारांसह अनेक इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे इंदापूर भाजपचे आमदार हर्षवर्धन पाटील हेदेखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच पंढरपुरातून भाजपसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पंढरपुरातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंतराव देशमुख हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक मानले जातात.  त्यांच्या या निर्णयाने भाजपला पंढरपुरात मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.

हेदेखील वाचा: ‘त्या’ डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला पोलीस कोठडी

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (29 ऑगस्ट)  पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात मोठी बैठक पार पडली. या बैठकीत वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वसंतराव देशमुख लवकरच आपल्या कार्यकर्त्यांसह हातात तुतारी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.वसंतराव देशमुखांमुळे पंढरपुरमध्ये शरद पवारांची ताकद वाढणार आहे.

कोण आहेत वसंतराव देशमुख?

वसंतराव देशमुख गेल्या 40 वर्षांपासून देशमुख भाजपमध्ये सक्रिय आहेत. पंढरपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.  माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक अशीही त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे पंढरपुरमध्ये तळागाळात त्यांचा जनसंपर्क अत्यंत चांगला आहे. आगामी विधानसभेत नशीब आजमावण्याची त्यांची इच्छा होती. भाजप पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली. पण भाजपने त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्याच मानले जात आहे.

हेदेखील वाचा:  गुजरात आहे जगातील सर्वात मोठ्या माशाचे घर; आतापर्यंत 900 शार्कला दिले जीवदान

Web Title: Bjps vasantrao deshmukh will join sharad pawar group nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 09:24 AM

Topics:  

  • BJP
  • pandharpur politics

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.