Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War : घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरुच; 900 सिलेंडर मिळतोय 2200 रुपयांना

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल, ढाबे, खाणावळी तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 14, 2026 | 07:46 AM
पुण्यात घरगुती गॅस सिलिंडर ब्लॅकने

पुण्यात घरगुती गॅस सिलिंडर ब्लॅकने

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : इराण-अमेरिका युद्धामुळे गॅस सिलेंडर पुरवठा प्रभावित होणार असल्याच्या अफवांमुळे शहरात बाजारात खळबळ उडाली आहे. परिणामी, घरगुती गॅस सिलिंडरची मागणी अचानक वाढल्याने काही ठिकाणी तुटवड्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा फायदा घेत काही ठिकाणी काळाबाजार सुरू झाल्याचे समोर आले आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची अधिकृत किंमत सुमारे ९०० रुपये असताना काळ्या बाजारात तोच सिलिंडर तब्बल २२०० रुपयांपर्यंत विकला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.

अनेक ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलेंडर उशिरा मिळत असल्याची तसेच वाढत्या मागणीमुळे वितरणात अडचणी येत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल, ढाबे, खाणावळी तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यवसाय बंद ठेवण्यापेक्षा अधिक दराने सिलिंडर खरेदी करून कामकाज सुरू ठेवण्याची वेळ काही व्यावसायिकांवर आली आहे.

हेदेखील वाचा : Strait of Hormuz Tension : आखातात 23000 भारतीय खलाशी, होमुर्जच्या सामुद्रधुनीत 24 जहाजे, केंद्राने परिस्थितीचा दिला आढावा

दरम्यान, भविष्यात गॅसची कमतरता भासेल या भीतीने अनेक नागरिक आधीच सिलिंडरची बुकिंग करत आहेत. काहींना तातडीची गरज नसतानाही अतिरिक्त सिलिंडरची बुकिंग केल्याने गॅस एजन्सींवर ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी एजन्सीबाहेर गर्दी व गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, काही जणांकडून सिलिंडरचा साठा करून जास्त दराने विक्री केली जात असल्याचेही समोर आले आहे. काही व्यावसायिक प्रतिष्ठाने नागरिकांकडून घरगुती सिलिंडर खरेदी करून त्याचा वापर करत असल्याचीही माहिती मिळत आहे.

विशेष पथके कार्यरत

गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. प्रत्येक तहसीलमध्ये एक तपास पथक नियुक्त करण्यात आले असून, जिल्हास्तरावर दोन विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

तपास पथकाकडून पडताळणी सुरु

तपास पथके गॅस एजन्सींमधील उपलब्ध साठा तसेच ग्राहकांची प्रत्यक्ष मागणी याची पडताळणी करत आहेत. ज्या ठिकाणी गॅस सिलेंडरचा वापर संशयास्पदरीत्या अधिक दिसून येईल, त्या ठिकाणी छापे टाकण्यात येणार आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक सिलिंडर बुकिंग टाळावे.

– महेश सुधालकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Black marketing of domestic gas cylinders continues unabated a cylinder worth 900 is being sold for 2200

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 07:46 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • LPG Shortage

संबंधित बातम्या

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…
1

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?
2

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल
3

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल

Alert ! सरकारने लागू केला LPG साठी नवा नियम ! त्वरित करा ‘हे’ काम नाहीतर Gas Connection होणार बंद
4

Alert ! सरकारने लागू केला LPG साठी नवा नियम ! त्वरित करा ‘हे’ काम नाहीतर Gas Connection होणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.