Sassoon Hospital
पुणे / अक्षय फाटक : कल्याणीनगर हायप्रोफाईल कार अपघातप्रकरणात (Porsche Car Accident) दररोज नवनवीन खुलासे होऊ लागले असून, आता ससून रुग्णालयात खळबळजनक प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. चाचणी करण्यास अल्पवयीन कार चालकाला ससून रुग्णालयात आणल्यानंतर खासगी व्यक्तींनी येथे येत प्रेशर करून रक्त बदलले. तर या व्यक्तींनी ‘सोबत’ आणलेले रक्त तपासणीसाठी पाठवण्यास भाग पाडले. यासर्व गोष्टी डॉ. तावरे याला माहिती होत्या त्याच्या सूचनेनुसार हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. तर ऐनवेळी रुग्णालयात आलेले हे खासगी व्यक्ती कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनसार, ससून रुग्णालयात तपासणीसाठी मुलाला आणले. तेव्हा संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालक मुलाचे रक्त घेतले होते. मात्र, ऐनवेळी आलेल्या खासगी इसमाने संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे रक्त बदलण्यास भाग पाडले आणि स्व:तसोबत आणलेले रक्त त्या ठिकाणी ठेवले. त्यामुळे त्या दिवशी ससून रुग्णालयात आलेले ते खासगी इसम कोण? कुणाच्या सांगण्यावरून ते रुग्णालयात आले होते? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल बदलणाऱ्या ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे. डॉ. तावरे यानेच रक्त बदल करण्याचा सल्ला दिला होता. पण, आता फक्त रक्त बदल करण्याचाच नाही तर ससून रुग्णालयात खासगी व्यक्तीचा शिरकाव व बाहेरून आणलेलेबते रक्त जमा करणे, ही सर्व माहिती तावरेला होती.
‘ते’ रक्त एका महिलेचे
‘ते’ रक्त एका महिलेचे असल्याचे समोर आले आहे. मात्र, ती महिला कोण आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. आई की दुसरीच महिला याचा तपास सुरु आहे. रक्त त्या तिघांनी बाहेरून आणले आणि डॉक्टरांना तपासणीसाठी दिल्याचा धक्कादायक प्रकार ससूनच्या चौकशी समितीतून समोर आला. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली.