Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला; कुणाला मिळणार पहिली उमेदवारी?

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळणाऱ्या मुबंई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी ला मतदान होणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 26, 2025 | 03:46 PM
BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला; कुणाला मिळणार पहिली उमेदवारी?
Follow Us
Close
Follow Us:
  • शिवसेना- भाजपनेही निवडणुकीची जोरदार तयारी
  • २०१७ च्या निवडणुकीत प्रीती पाटणकर यांनी १९२ प्रभागातून ठाकरे गटातून विजय मिळवला होता
  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांसाठी मतदान
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना- भाजपनेही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावेळी ठाकरे बंधू आणि भाजप-शिवसेना महायुतीची चुरशीची लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

अशातच मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दादरमधील मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९२ साठी उमेदवाराची चर्चा झाली. या चर्चेच्या शेवटी या प्रभागात मनसेचे नेते यशवंत किल्लेदार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि ठाकरे सेनेच्या पहिल्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीत प्रीती पाटणकर यांनी १९२ प्रभागातून ठाकरे गटातून विजय मिळवला होता.

Public Safety Law Maharashtra: महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा लागू, अध्यादेशही जारी

त्याचवेळी प्रभाग क्रं. १९२ साठी ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. जागावाटपात प्रभाग क्रं. १९२ मनसे आणि १९४ ठाकरेंच्या शिवेसनेला सोडण्यात आल्याची माहिती आहे. पण प्रभाग १९२ आपल्यला मिळावा, यासाठी ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे. त्यासाठी ते आज सायंकाळी चार वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हेदेखील शिवसैनिकांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांसाठी मतदान-

दरम्यान, आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळणाऱ्या मुबंई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २२७ प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकराज आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर या महापौर म्हणून कार्यरत होत्या.

Former PM Manmohan Singh Death Anniversery: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या ७ निर्णयांनी बदलली देशाची दिशा आणि दशा

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ : संभाव्य कार्यक्रम जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २०२६ च्या निवडणुकीसाठी संभाव्य कार्यक्रम समोर आला आहे. या कार्यक्रमानुसार डिसेंबर २०२५ अखेरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून, जानेवारी २०२६ मध्ये मतदान आणि निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम

नामांकन दाखल : २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५

नामांकन पत्रांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५

नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख : २ जानेवारी २०२६ पर्यंत

अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : ३ जानेवारी २०२६

मतदान : १५ जानेवारी २०२६

मतमोजणी / निकाल : १६ जानेवारी २०२६

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Bmc election 2026 has raj thackerays first candidate for the mumbai municipal corporation election been decided

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • BMC Election 2025
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सगळे सोडून चालले! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
1

Maharashtra Politics: सगळे सोडून चालले! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा शिलेदार फुटला
2

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा शिलेदार फुटला

Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ

Congress on Thackeray Alliance: राज-उद्धव युतीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रीया; आम्ही कधीही मनसेशी…
4

Congress on Thackeray Alliance: राज-उद्धव युतीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रीया; आम्ही कधीही मनसेशी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.