Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena & MNS seat sharing: ठाकरे गट-मनसेची जागावाटपाची चर्चा पूर्ण; दादर, शिवडी, भांडूप, विक्रोळी प्रभागांवरील वाद मिटले

ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते. युतीची घोषणा करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 22, 2025 | 03:31 PM
Shivsena & MNS seat sharing:  ठाकरे गट-मनसेची जागावाटपाची चर्चा पूर्ण; दादर, शिवडी, भांडूप, विक्रोळी प्रभागांवरील वाद मिटले
Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चांना वेग
  • शिवडीतील दोन प्रभाग ठाकरे गटासाठी आणि एक प्रभाग मनसेसाठी
  • शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते
Shivsena & MNS seat sharing: राज्यातील बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील मनसे–ठाकरे गटाचे जागावाटप आधीच निश्चित झाले होते. मात्र दादर, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी परिसरातील काही प्रभागांवरून अद्याप तिढा कायम होता. सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा तिढा अखेर सुटला. या बैठकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 यांच्या जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असल्याची माहिती आहे.

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…

मातोश्रीवर झालेल्या चर्चेअखेर शिवडीतील दोन प्रभाग ठाकरे गटासाठी आणि एक प्रभाग मनसेसाठी सोडण्यात आला आहे. या बैठकीसाठी मातोश्रीवर मनसे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई हेदेखील उपस्थित होते.  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या उपस्थितीत चर्चा करून शिवडीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर झालेल्या भांडूप , विक्रोळी, दादर आणि माहिम या भागातील प्रभागांच्या जागावाटपाची चर्चा झाली. सुरूवातील विक्रोळी आणि भांडूपमधील प्रभाग क्रमांक 109, 110 114, 115 या चार जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला. तर दादर, माहीममधील वार्ड क्रमांक 192 , 194, 193 या तीन प्रभागांवरही दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला होता. यासंदर्भात करण्यात विशाखा राऊत आणि अनिल देसाई यांच्यात मातोश्रीवर चर्चा झाली. याशिवाय आमदार सुनील राऊत आणि खासदार संजय दिना पाटील हे बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांच्यासोबत मातोश्रीवर चर्चा करत आहेत. आज दिवसभरात जागावाटप अंतिम करून मनसे आणि ठाकरे गटाकडून युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Nitish Kumar : आता माफी मागणार का…? हिजाब वादाचा प्रश्न ऐकून नितीश कुमार यांनी थेट जोडले हात

ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते. युतीची घोषणा करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. यासाठी गोरेगावमधील नेस्को सेंटर, बांगुर नगर मैदान (गोरेगाव) आणि वरळी डोम या तीन ठिकाणांची चाचपणी सुरू असून, यापैकी एका ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील इतर महानगरपालिकांमधील जागावाटपाबाबतच्या चर्चा देखील अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. (BMC Election 2026)

कधी होणार राज्यातील महापालिका निवडणूका?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. एकूण 2,869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

 

 

Web Title: Bmc election 2026 seat sharing talks between mns and shiv sena reach final stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • BMC Election 2025
  • MNS Raj Thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Kailas Patil on Opreation Tiger: मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं
1

Kailas Patil on Opreation Tiger: मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?
2

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?

Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेली 4 किलो चांदीची वीट बेपत्ता? संजय राऊतांचा गंभीर सवाल
3

Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेली 4 किलो चांदीची वीट बेपत्ता? संजय राऊतांचा गंभीर सवाल

Mahavikas Aaghdi Politics: महाविकास आघाडीत नव्या भुकंपाची चाहूल; बैठकीला २३ आमदारांची गैरहजेरी
4

Mahavikas Aaghdi Politics: महाविकास आघाडीत नव्या भुकंपाची चाहूल; बैठकीला २३ आमदारांची गैरहजेरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.