
Baramati By Election: सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी
मुंबई महारोलिकेत एकूण शिल्लक ठेवी: ₹८१,४४९.३२ कोटींच्या आहेत. यातील अस्पर्शित निधी (राखीव): यातील ₹४४,८२६.२३ कोटी हा निधी ‘बांधील दायित्वापोटी’ (कर्मचारी पेन्शन, भविष्यनिर्वाह निधी इ.) राखीव आहे. हा निधी नियमानुसार पालिकेला खर्च करता येणार नाही. उर्वरित ₹३६,६२३.०९ कोटी रुपयांच्या ठेवी आता विविध मोठ्या प्रकल्पांसाठी (उदा. रस्ते, सांडपाणी प्रकल्प, कोस्टल रोड) वापरल्या जाणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट झाले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे ८०,९५२.५६ कोटी रुपयांचे भव्य अंदाजपत्रक आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे सादर केले. गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांच्या काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असून, मागील २०२५-२६ च्या ७४,४२७.४१ कोटींच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदा ८.७७ टक्क्यांची मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा ६,५२५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पालिकेच्या ८१,४४९.३२ कोटी रुपयांच्या एकूण ठेवींपैकी ३६,६२३.०९ कोटी रुपयांच्या ठेवी विविध विकास प्रकल्पांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताबदलानंतर महायुती सरकार पालिकेच्या ठेवी मोडणार असल्याचा जो प्रचार ठाकरे गटाकडून केला जात होता, त्याचे प्रतिबिंब आता प्रत्यक्ष अर्थसंकल्पातून स्पष्टपणे उमटल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिका ठेवी मोडण्याचा तयारीत असून एकूण ठेवी 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी 44 हजार 826 कोटी 23 लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र, उर्वरित 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबईत जवळपास एकूण 101 पुलाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी 24 कामं पूर्ण झाली असून मार्च 2026 पर्यत 23 कामे पूर्ण होणार आहेत. 2026-27 मध्ये 31 कामे पूर्ण करण्यात येतील. 2028-29 मध्ये 23 पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे. नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण 9 हजार 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कोस्टल रोडच्या 6 व्या टप्याचा समावेश आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे ८०,९५२.५६ कोटी रुपयांचे भव्य अंदाजपत्रक आयुक्त भूषण गगराणी यांनी आज सादर केले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात ८.७७ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, प्रशासकीय राजवटीनंतर नव्या सत्ताधाऱ्यांच्या काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प ठरला आहे.
या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे पालिकेच्या ठेवींचा (Fixed Deposits) विनियोग.
एकूण ठेवी: ८१,४४९.३२ कोटी रुपये.
राखीव निधी: यातील ४४,८२६.२३ कोटी रुपये बांधील दायित्वापोटी (Liabilities) राखीव असल्याने ते वापरता येणार नाहीत.
विकासकामांसाठी वापर: उर्वरित ३६,६२३.०९ कोटी रुपये विविध प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत. ठाकरे गटाने केलेला ‘ठेवी मोडण्याचा’ आरोप या निर्णयामुळे आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.