Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय! अनुसूचित जातीपासून ते कृषी विभागापर्यंत… वाचा एका क्लिकवर

Maharashtra Cabinet Meeting News: अनुसूचित जातीपासून ते कृषी विभागापर्यंतच्या या निर्णयाचा यात समावेश आहे. तसेच करज्त आणि अहिल्यानगर येथे अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 28, 2026 | 03:14 PM
Maharashtra Cabinet meeting- मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय!

Maharashtra Cabinet meeting- मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय!

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय!
  • अनुसूचित जातीपासून ते कृषी विभागापर्यंत…
  • वाचा एका क्लिकवर
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) महत्त्वाची मोठा बैठक झाली. या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अनुसूचित जातीपासून ते कृषी विभागापर्यंतच्या या निर्णयाचा यात समावेश आहे. तसेच करज्त आणि अहिल्यानगर येथे अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय गौण खनिजाचं अवैध खनन रोखण्यासाठी दहापट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात आलेले आठ महत्त्वाचे निर्णय

१. महाअॅग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रिटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील “व्यवस्थापकीय संचालक” पदास मान्यता. (कृषी विभाग)

२. मादक द्रव्ये व मादक पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत दाखल प्रकरणे चालविण्याकरीता पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यास मान्यता. (विधि व न्याय)

३. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता. (विधि व न्याय)

४. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता.(विधि व न्याय)

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/BAnj7lYMuD — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 28, 2026


मोठी बातमी ! तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा दणका; ‘त्या’ कारवाईला स्थगिती

५. अनुसुचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९, सुधारीत अधिनियम, २०१५ अनुसार दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड व यवतमाळ येथे अनन्य विशेष न्यायालये (Exclusive Special Courts) स्थापन करण्यास मान्यता. (विधि व न्याय))

६. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्याकरिता अध्यादेश. (ग्राम विकास व पंचायती राज)

७. मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित कंपनीच्या अधिकृत समभाग भांडवलामध्ये २५ कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयापर्यंत वाढविणार. कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातही २५ कोटी वरुन २२५ कोटी रुपये वाढवणार. *(नगर विकास विभाग-१)

८. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८ (७) सुधारणा. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसाठी स्वामित्वधनाच्या दहापट दंड. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

विठ्ठलाच्या साक्षीने कर्जमुक्तीचा श्रीगणेशा! पंढरीतून ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; ‘शब्द पाळला’ म्हणत मुख्यमंत्र्यांची घोषणा

Web Title: Bold decisions taken by the maharashtra cabinet meeting under the chief ministers chairmanship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Cabinet Meeting
  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra news
  • Maharashtra Political

संबंधित बातम्या

Aditi Tatkare: ‘१५०० रुपये मिळताच महिलांची बाजारात…’; वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ, नवा वाद पेटण्याची शक्यता
1

Aditi Tatkare: ‘१५०० रुपये मिळताच महिलांची बाजारात…’; वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ, नवा वाद पेटण्याची शक्यता

‘मला आनंद आहे की…’, राज-उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2

‘मला आनंद आहे की…’, राज-उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कोकणवासियांवर बाप्पा पावला! रेल्वे प्रशासन अतिरिक्त गाडया सोडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
3

कोकणवासियांवर बाप्पा पावला! रेल्वे प्रशासन अतिरिक्त गाडया सोडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

‘Mann Ki Baat’मध्ये पंतप्रधान मोदींचा कारगिल वीरांना सलाम; अजून कोणते 5 मुद्दे मांडले जाणून घ्या…
4

‘Mann Ki Baat’मध्ये पंतप्रधान मोदींचा कारगिल वीरांना सलाम; अजून कोणते 5 मुद्दे मांडले जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.