Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle यांना शेवटचा निरोप देण्यासाठी लोटले चाहते; निवासस्थानी पार्थिवाचे अंत्यदर्शन

Asha Bhosle Funeral : लोकप्रिय जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले असून त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 13, 2026 | 11:51 AM
Bollywood Singer Asha Bhosle Funeral at Shivaji Park Live Mumbai News

Bollywood Singer Asha Bhosle Funeral at Shivaji Park Live Mumbai News

Follow Us
Follow Us:

Asha Bhosle Funeral : मुंबई : आवाज सुमधूर आवाजाने बॉलीवुडवर सात दशके राज्य करणाऱ्या जेष्ठ गायिका सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन झाले. त्यांची काल (दि.12 एप्रिल) रोजी प्राणज्योत मालावली. 11 एप्रिल रोजी आशा ताईंना ह्रदयविकाराचा झटका आला होता. याच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे बॉलीवुडवर (Bollywood News) शोककळा पसरली आहे.. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. आशा भोसले यांच्यावर आज शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी आशाताईंचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी कॅसा ग्रॅंडे येथील घरी ठेवण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थित झाले आहेत. आशा भोसले यांनी आपल्या जादूई आवाजने सर्वांच्या मनावर राज्य केले. त्यांचे संगीतसृष्टी, सिनेसृष्टी, नाटकसृष्टी, राजकारण, समाजकारण आणि क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील दिग्गजांसोबत ऋणानुबंध होते. आज प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झाला आहे.

हे देखील वाचा : सांगलीच्या ‘आशा’ अन् ऋणानुबंध! जन्मभूमीतून सुरू झालेला सुरांचा प्रवास जगभर

12 हजारहून अधिक गाणी गायलेल्या आशा भोसले यांनी भावगीत, भक्तिगीत आणि लावणीसारख्या विविध संगीतप्रकारांना नवे आयाम दिले. शास्त्रीय संगीतासाठी साथ त्यांनी कधी सोडली नाही. आशा भोसले यांनी अनेकांशी मायेचा स्नेह कायम ठेवला होता. त्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी उसळली आहे. आज सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत अंत्यदर्शनाची वेळ ठेवण्यात आली असून त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची रीघ लागलेली पहायला मिळत आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंचे अंतिम दर्शन घेतले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण केले. त्याचबरोबर आशिष शेलार, राज ठाकरे, रितेश देशमुख, ए. आर. रहमान यासारख्या अनेक बॉलिवूड क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार यांच्यासह राजकारण्यांनी अंतिम दर्शन घेतले आहे.

हे देखील वाचा : अपूर्ण राहिली एक इच्छा! ‘आशाताई आणि ते Guitar…’, Tabu ची ‘ती’ पोस्ट येतेय चर्चेत

राज्य सरकारच्या वतीने आशा भोसले शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप दिला जाणार असून पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. तसेच त्यांना कॅबिनेटमध्ये देखील आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. मुंबई महानगर पालिकेकडून आशाताईंच्या अंत्यविधीची तयारी झाली आहे. अंत्यविधीच्या ठिकाणी 500 पेक्षा अधिक अतिमहत्वाचे लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमीच्या आजूबाजूला LED स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तेथे LED स्क्रीन आणि साउंडवर आशाताईंचे गाणी लावून आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

Web Title: Bollywood singer asha bhosle funeral at shivaji park live mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • asha bhosle
  • Bollywood News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
1

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी
2

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम
3

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल
4

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.