Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule News : पाणीपुरवठा योजनेला गती द्या! १५ जानेवारीपर्यंत ३३ गावांना पाणी देण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेला आता वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी १५ जानेवारीपर्यंत किमान ३३ गावांत प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 27, 2026 | 07:08 PM
GULABRAO PATIL

GULABRAO PATIL

Follow Us
Follow Us:
  • शिंदखेड्यातील ८५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेला वेग
  • १५ जानेवारीपर्यंत ३३ गावांना पाणी देण्याचे उद्दिष्ट
  • पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २.९६ कोटींचे नियोजन
 

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे व ८५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून द्यावे. येत्या १५ जानेवारीपर्यंत किमान ३३ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून कामांना गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. योजनेतील प्रलंबित कामे पूर्ण करणे आणि पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा देणे, याला प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

मंत्रालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिंदखेडा तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती, चिमठाणे व ८५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हेदेखील उपस्थित होते. याशिवाय या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, जल जीवन मिशनचे अधिकारी, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता व संबंधित अभियंते, तसेच विभागाचे आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

योजनेच्या कामाची भौतिक प्रगती सुमारे ५१ टक्क्यांपर्यंत झाली आहे. मुख्य उद्भव विहीर, पंपगृह, जलशुद्धीकरण केंद्र, विद्युत जोडणी तसेच शुद्ध पाणी वाहिन्या आणि वितरण व्यवस्थेतील काही कामे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. त्यामुळे उर्वरित कामांचे टप्पेनिहाय नियोजन करून संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; मावळच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शासकीय समिती येणार

प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याला प्राधान्य

योजनेच्या कामातील विलंबामुळे संबंधित कंत्राटदारावर प्रतिदिन जवळपास चार लाख रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला असून, दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. हा दंड शिथिल करण्याची मागणी कंत्राटदाराकडून करण्यात आली होती. मात्र, प्रथम कामाची गती वाढवून निर्धारित उद्दिष्टानुसार गावांमध्ये प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करावा. त्यानंतरच दंड शिथिल करण्याच्या मागणीचा विचार केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका मंत्री पाटील यांनी मांडली.

योजनेचा लाभ ८५ गावांतील नागरिकांना मिळणे अपेक्षित असल्याने कामातील विलंब दूर करणे आवश्यक आहे. केवळ आर्थिक दंडाबाबत निर्णय घेण्याऐवजी प्रत्यक्ष कामाची प्रगती, उर्वरित कामांची पूर्तता आणि नागरिकांना पाणी उपलब्ध होण्याच्या कालमर्यादेला महत्त्व दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाणीटंचाई निवारणासाठी स्वतंत्र नियोजन

बैठकीत शिंदखेडा तालुक्यातील आगामी पाणीटंचाईच्या परिस्थितीचाही आढावा मंत्री पाटील यांनी घेतला. ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी तालुक्यातील ११६ गावांकरिता १२९ उपाययोजना प्रस्तावित असून, त्यासाठी एकूण २ कोटी ९६ लाख ९० हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. यामध्ये विंधन विहिरी, विशेष नळ योजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना, विहिरींचे अधिग्रहण व खोलीकरण तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा अशा उपाययोजनांचा समावेश आहे. योजनेची कामे पूर्ण होईपर्यंत नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

योजनेतील प्रमुख कामांसाठी आवश्यक विद्युत पुरवठा उपलब्ध करणे, जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामग्री व विद्युत जोडणीची कामे पूर्ण करणे, उर्वरित जलवाहिन्या टाकणे आणि रेल्वे व रस्ते ओलांडण्याशी संबंधित कामे मार्गी लावणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पाइपलाइनच्या मार्गातील स्थानिक अडचणीही दूर कराव्या लागणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करून कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि ठरविलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घ्यावा, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम किती पूर्ण झाले आहे?

    Ans: योजनेची भौतिक प्रगती सुमारे ५१ टक्के झाली आहे. मुख्य उद्भव विहीर, पंपगृह, जलशुद्धीकरण केंद्र, विद्युत जोडणी आणि पाइपलाइनची काही कामे अद्याप बाकी आहेत.

  • Que: शिंदखेड्यातील किती गावांना १५ जानेवारीपर्यंत पाणी मिळणार आहे?

    Ans: मंत्री गुलाबराव पाटील यांनी १५ जानेवारीपर्यंत किमान ३३ गावांमध्ये प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करून कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

  • Que: : शिंदखेडा तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी किती निधी प्रस्तावित आहे?

    Ans: ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी ११६ गावांमध्ये १२९ उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्यासाठी २ कोटी ९६ लाख ९० हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित असून, यात टँकर, विंधन विहिरी, विहिरींचे खोलीकरण आणि नळ योजनांच्या दुरुस्तीचा समावेश आहे.

Web Title: Dhule news shindkheda 85 villages water supply scheme 33 villages vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • dhule news
  • Gulabrao Patil
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर
1

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम
2

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम

Shalarth ID Scam : अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; पगार रोखण्यासह मान्यता रद्द करण्याच्या हालचाली
3

Shalarth ID Scam : अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; पगार रोखण्यासह मान्यता रद्द करण्याच्या हालचाली

Manoj Jarange Audio Clip Row : 500 कोटींच्या क्लिपची SIT चौकशी होणार, शैलेश बलकवडे यांच्याकडे मोठी जबाबदारी
4

Manoj Jarange Audio Clip Row : 500 कोटींच्या क्लिपची SIT चौकशी होणार, शैलेश बलकवडे यांच्याकडे मोठी जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.