Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : शासकीय मदतीच्या मोबदल्यात २४ हजारांची लाच; महिला व बालविकास विभागाचा संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बुलढाणा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी तुषार राणे यांना शासकीय योजनेतील आर्थिक मदतीच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2026 | 09:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील एका संरक्षण अधिकाऱ्याला शासकीय योजनेतील आर्थिक मदतीच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी खरेदी-विक्री सहकारी समिती कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे शासकीय योजनांमधील लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

MSRTC Financial Loss: एसटी महामंडळाला ऐन पीक सीझनमध्ये कोट्यवधींचा फटका! एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित उत्पन्न बुडाले

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मामेबहिणीच्या निराधार व दिव्यांग मुलीला शासनाच्या ‘क्रांतिज्योती बालसंगोपन योजना’ तसेच अन्य विशेष योजनेअंतर्गत ४८ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली होती. मात्र, ही रक्कम मिळाल्याच्या मोबदल्यात तसेच भविष्यातही शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी तुषार राणे यांनी तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.

ठरल्याप्रमाणे, २४ हजार रुपयांच्या लाचेपैकी पहिला हप्ता म्हणून १२ हजार रुपये स्वीकारण्यासाठी आरोपी तुषार राणे जळगाव जामोद येथील तालुका शेतकरी खरेदी-विक्री सहकारी समिती कार्यालयासमोर आले. त्यावेळी एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात जगन्नाथ तुकाराम भिवटे (वय ४०) यांचाही सहभाग समोर आला आहे. तपासात त्यांनी लाच व्यवहारासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

Sudhir Gadgil : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

दोन्ही आरोपींविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. एसीबीकडून या प्रकरणातील इतर बाबींचीही चौकशी केली जात आहे. ही कारवाई बुलढाणा एसीबीचे पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे यांच्यासह एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली. दरम्यान, एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय काम करून देण्यासाठी अथवा योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. अशा तक्रारींवर गोपनीय पद्धतीने कारवाई केली जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Bribe of rs 24000 in exchange for government assistance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Buldhana

संबंधित बातम्या

Buldhana News : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध व्हा; शिक्षक उद्बोधन कार्यशाळेत शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे आवाहन
1

Buldhana News : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध व्हा; शिक्षक उद्बोधन कार्यशाळेत शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे आवाहन

Buldhana News : जिल्ह्यातील पोलिस अंमलदार व हेड कॉन्स्टेबलच्या बदल्या! ३ एनपीसी यांचा समावेश
2

Buldhana News : जिल्ह्यातील पोलिस अंमलदार व हेड कॉन्स्टेबलच्या बदल्या! ३ एनपीसी यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.