Brilliant Performance by Aishwarya of Sambhajinagar in The World's Most Challenging Ironman 70.3 Event
The Ironman 70.3 Triathlon : क्रीडा विश्वातील सर्वात आव्हानात्म असलेल्या Ironman 70.3 स्पर्धा परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास आणि शारिरीक क्षमता अशा कित्येक कसोट्यांवर टिकत छत्रपती संभाजीनगरच्या ऐश्वर्या आघावनं चमकदार कामगिरी केली आहे. आयर्नमॅन 70.3 ट्रायथलॉनमध्ये 1.9 किमी पोहणं, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमीची मॅरेथॉन अशा तीन प्रकारांचा समावेश असून जागतिक पातळीवर महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत दमदार कामगिरी करीत ऐश्वर्या आज मायदेशी परतत असून तिच्या कामगिरीने देशाची मान उंचावली आहे.
महाराष्ट्राची मान उंचावली
ऐश्वर्या आघावने दमदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. आयर्नमॅन 70.3 ला हाफ आयर्नमॅन म्हणूनही ओळखलं जातं. जगातील सर्वात आव्हानात्मक मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. जिथं सहभागी अॅथलिटच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्याची संधी मिळते. अनेक अनुभवी खेळाडूंनाही या स्पर्धेत अंतिम टप्पा गाठणे अवघड जाते.
स्पर्धेच्या एक महिन्यापूर्वी ऐश्वर्या आजारी
प्रचंड वेळ, मेहनत आणि चिकाटीनं या स्पर्धेसाठी तयारी करावी लागते. पण अशा महत्वाच्या काळात स्पर्धेच्या महिनाभर आधी ऐश्वर्या आजारी पडल्यानं तिच्या कोचसह पालकांनाही खूप चिंता वाटत होती. यातून सावरत तीव्र परिश्रम करत ऐश्वर्यानं या स्पर्धेत भाग घेतला आणि यशही मिळवलं.
कुटुंबियांची मान उंचावली
आयर्न मॅन 70.3 ही स्पर्धा जगभरातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेत छत्रपती संभाजी नगरच्या ऐश्वर्या आघावनही भाग घ्यायचा ठरवला. आणि त्यात ती यशस्वी ही झाली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील की एकमेव तरुणी दर्जेदार कामगिरीनंतर आज मायदेशी परतणार आहे. तिच्यासोबत पाच वेळा आयर्न मॅन झालेले नितीन घोरपडेही इटलीवरून परतणार असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.