
कुठे चालली तरुण पिढी ? एकतर्फी प्रेम, नंतर छळ..., त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या (Photo Credit - X)
राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास
पिशोर (दिगर) (ता. कन्नड) येथे राहणारे गोरख संगराव शिंदे (६०) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांचा मुलगा श्रीकात उर्फ शक्ती हा मागील दोन वर्षांपासून जाधववाडी भागात राहत होता. तो सायबर सिक्युरिटीशी संबंधित क्लास करत होता. ९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास श्रीकांत याने जाधववाडी येथील राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारसुरु असतांना १० डिसेंबर रोजी पहाटे १.१५ वाजता त्याची प्राण ज्योत मालावली.
मोनूला शिक्षा देऊ नका
श्रीकांत याने भाग्यश्रीला प्रेमाची साद घातली होती, माञ तिने नकार दिला. त्यानंतर भाग्यश्री तीचा प्रियकर, बहिण व इतरांनी त्याचा छळ केला. आत्महत्येचे पाऊल उचल्याची माहिती तपास अधीकारी उपनिरीक्षक सचिन पागोटे यांनी दिली. सुसाईड नोटच्या शेवटी श्रीकांतने एक भावनिक उल्लेख करत मोनुला शिक्षा देऊ नका आणि तिला कोर्टात नेऊ नका अशी विनंती केल्याची माहिती पागोटे यांनी दिली.
सुसाईड नोटने खळबळ
पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता तेथे श्रीकांतने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत त्याने वरिल पाच लोकांमुळे आपण मानसिक तणावात असल्याचे व त्यांच्याच त्रासाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे लिहिले आहे. लॅपटॉपमध्ये संबंधित व्यक्तींचे फोटो सेव्ह करून ठेवल्याचा उल्लेखही नोटमध्ये केला आहे.
गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी सुरुवातीला हर्सल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र सुसाईड नोट आणि वडिलांच्या तक्रारीनंतर आता संबंधित व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.