Nagpur News: कोल्हापूरच्या नंदिनी मठातील महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘जिओ’ या मोबाईल नेटवर्कवर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. सध्या हत्तीणीवर उपचारासाठी गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे, परंतु कोल्बहापुरचे नागरिक सातत्याने तिच्या परतीची मागणी करत आहेत.
पण त्याचवेळी आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यापूर्वी नागपूरहून तब्बल १९ वाघांना उपचारासाठी वनतारा रेस्क्यू सेंटरला हलवण्यात आले होते. मात्र, याबाबत फार थोड्या लोकांनाच माहिती असल्यामुळे हा मुद्दा फार चर्चेत आला नाही. त्यामुळे वनताराला नेले जाणारे प्राणी उपचारानंतर पुन्हा संबंधितांना परत केले जात आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Madhuri Elephant News: जात-पात-धर्म सोडून माधुरीसाठी कोल्हापुरकर एकवटले; नांदणीतून मोर्चाला सुरूवात
येथे अंबानी कुटुंबाच्या वन्यजीव संवर्धनातील पुढाकाराचा उल्लेख होतो. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी जगभरातील दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण आणि उपचारासाठी विशेष पावले उचलली आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने हे वाघ वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात आले. याआधी कोणत्याही भारतीय प्राणी संग्रहालयात किंवा वन्यजीव रेस्क्यू सेंटरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांचे स्थलांतर झालेले नव्हते.
काही महिन्यांपूर्वी विदर्भातील १९ वाघ वनतारा सेंटरला उपचारासाठी नेण्यात आले होते. आजही या वाघांची गर्जना वनतारात ऐकू येते. विदर्भात जखमी झालेल्या वाघांना गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारासाठी नेले जाते. पण कधीकधी यावाघांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत देशभरातील प्राणीसंग्रहालय चालक केंद्र सरकारमार्फत प्राण्यांची देवाणघेवाण करण्याचा निर्णय घेतात. केंद्रीय मंजुरी मिळाल्यानंतर प्राण्यांची देवाणघेवाण करणे ही एक सामान्य पद्धत आहे.
गोरेवाडामध्येही हेच धोरण पाळण्यात आले. जखमी वाघांच्या उपचारासाठी १९ वाघांना वनताराला पाठवण्यात आले पण पुढील धोरणांचे पालन करण्यात आले नाही. इतकेच नाही तर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत एवढा मोठा निर्णय मंजूर करण्यात आला. पण एलढ्या मोठ्या निर्णयानंतरही वाघ पुन्हा विदर्भात आणले गेले नाही. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते अंबानी यांच्या प्रभावाशिवाय एवढी मोठी गोष्ट होणे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा वाघांची मागणी केली जाते. त्यावेळी २-४ वाघही खूप जास्त असतात कारण वाघाचे संगोपन करणे सोपे नसते. वाघाला खायला घालण्याचा खर्च खूप जास्त असतो. दरमहा एका वाघावर १ लाख रुपये खर्च केला जातो. हे सामान्य प्राणीसंग्रहालय मालकांच्या अधिकारात नाही. म्हणून, कधीही ४ वाघांपेक्षा जास्त वाघ पाठवले गेले नाहीत.
विदर्भातील वाघ प्रेमींच्या माहितीनुसार, कधीकधी बचाव केंद्रात वाघांची संख्या जास्त होते हे खरे आहे. त्यांना ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. देशातील अनेक प्राणीसंग्रहालय मालक देखील वाघ हवे असलेल्या रांगेत उभे असतात. पण त्यांना वाघ उपलब्ध करून दिले जात नाहीत. पण वनतारासाठी २०२३ च्या अखेरीस ४ वाघ आणि २०२४ मध्ये एकत्रितरित्य १५ वाघ पाठवण्यात आले होते. १५ वाघ एकाच ठिकाणी पाठवण्यात आले.वाघ पाठवल्यानंतर, काही अधिकाऱ्यांना वाघांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वनताराला पाठवण्यात आले. सर्व वाघ चांगल्या वातावरणात आहेत आणि त्यांच्यावर उपचार देखील चांगल्या पद्धतीने केले जात असल्याचे आढळून आले.
पाहा व्हिडीओ-