जात-पात-धर्म सोडून माधुरीसाठी कोल्हापुरकर एकवटले; नांदणीतून मोर्चाला सुरूवात
Madhuri Elephant News: कोल्हापुरच्या नांदणी येथील मठातील माधुरी ऊर्फ महादेवी नावाच्या ३३ वर्षीय हत्तीणीला गेल्या आठवड्यात गुजरातमधील वनतारा अभयारण्यात नेण्यात आले. या घटनेनंतर कोल्हापूरसह राज्यभरातून निषेधाचे पडसाद उमटू लागले आहेत. महादेवी हत्तीण परत आणण्यााठी रविवारी (३ ऑगस्ट) पहाटे पाच वाजल्यापासून कोल्हापूर येथील नांदणीपासून पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह इतर पक्षांचे प्रतिनीधीही या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. दिवसभरात ४५ किलोमीटची ही यात्रा निघणार असून कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकणार आहे, यात हजारो सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे हा मूक मोर्चा अत्यंत शांततेत होणार आहे, नांदणी येथील निशीधिका येथील श्री चक्रेश्वर देवीची आरती झाल्यानंतर या पदयात्रेला सुरूवात झाली.
ही पदयत्री निशीधिका- माणगांवेकोडीहून कोल्हापूर- सांगली महामार्गावरून निघणार आहे. माधुरी हत्तीणीच्या संरक्षणासाठी आणि न्यायासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, गुजरातमधील जामनगर येथील वनतारा अभयारण्यात नांदणी मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीीला बेकायदेशीरपणे नेण्यात आले. खोटे वैद्यकीय रिपोर्ट तयार करून माधुरीला वनताराच्या स्वाधीन करण्यात आले. कोल्हापूरच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी माधुरी प्रवासासाठी फिट असल्याचा अहवाल दिला. जंगली प्राण्यांची वाहतूक रात्रीच्या वेळी करायची नसते, असा कायदा असतानाही रात्री १२ वाजल्यानंतर तिची पुढे सलग ४८ तास प्रवास करून माधुरीला वनतारामध्ये नेण्यात आले.
रवींद्र जडेजाने केली विश्वविक्रमाची बरोबरी, सुनील गावस्कर यांना मागे टाकुन बनला नंबर 1 भारतीय
सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. तो अंतिम निर्णय नाही, कोर्टाचा निर्णय बदलण्याची अधिकार देशाच्या राष्ट्रपतीना आहे. आजपर्यंत अनेक फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या कैद्यांनी दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे केला आहे. आम्हीदेखील आमच्या माधुरीला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींकडे अर्ज करणार आहोत. माधुरीला लिहीता वाचता येत नाही, पण तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नांदणीत चार तास चाललेल्या तिच्या निरोपाच्या मिरवणुकीत तिने पाण्याचा थेंब घेतला नाही की फळ घतले नाही. रडत रडत माधुरीने नांदणी मठ सोडला, तिला मठ सोडायचा नव्हता यातून हे स्पष्ट होते. असंही खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं
माधुरीच्या वतीने आम्ही सर्वजण महामहिम राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा घेऊन निघालो आहोत. हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्याननंतर आमच्यासोबत असणाऱ्या १० महिला भगिनी माधुरीच्या वतीने राष्ट्रपतींना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रपतींना यावर निर्णय घ्यायचा आहे.
राज्यातील स्थानिक निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट; डिसेंबरपर्यंत सर्व निवडणुका होणार तर दिवाळीनंतर…
आमच्या मूक मोर्चाचे नेतृत्त्व कोणाही करत नाही, कुठलाही झेंडा नाही, जात-पात-धर्म नाही. केवळ तथाकतित पेटा प्राणी संस्थेने माधुरीवर अन्याय केला आहे. या देशातील उद्योगपतींनी आमच्यावर कसा अन्याय केलाय ही सांगण्यासाठी राष्ट्रपतींपर्यंत पोहचवण्यासाठी ही हजारोंची जनता मूक मोर्चा घेऊन निघाली आहे. असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ-