Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: ‘एचएसआरपी’ नसलेल्या ७४० वाहनांवर कारवाई; ५७ हजाराचा दंड वसूल; परिवहन विभागाची मोहीम

Buldhana HSRP number plate traffic action: बुलढाणा जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) न बसविणाऱ्या वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने कडक कारवाई केली आहे. १ जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांत तब्बल ७४० वाहनांवर कारवाई करून संबंधित वाहनचालकांकडून ५७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 14, 2026 | 09:40 PM
HSRP number plate traffic action

HSRP number plate traffic action

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात HSRP नसलेल्या ७४० वाहनांवर कारवाई
  • ५७ हजारांचा दंड वसूल
  • नंबर प्लेटमधील छेडछाड रोखण्यासाठी धडक कारवाई
बुलढाणा: वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊन देखील हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकडे कानाडोळा करणाऱ्या वाहनधारकांवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. परिवहन विभागाच्या वतीने १ जुलै ते जिल्ह्यात एचएसआरपी ऑगस्ट या दोन महिन्यात नसलेल्या तब्बल ७४० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहनचालकांकडून ५७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?

जिल्ह्यात एकूण ३ लाख ४० हजार वाहनांची नोंद असून त्यापैकी १ लाख ९० हजार ४०० वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवून घेतल्या नाहीत. त्यामुळे वाहनांची ओळख, सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. जिल्ह्याच्या घाटाखालील ७ तालुक्यासाठी खामगाव येथे व ६ तालुक्यासाठी बुलढाणा येथे स्वातंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. बुलढाणा कार्यालयाअंतर्गत १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत असलेल्या २ लाख ९० हजार २९१

वाहनांपैकी १ लाख २७ हजार ७२० वाहनांवर एचएसआरपी प्लेट बसविण्यात आले. तर खामगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या ५० हजार ३१२ वाहनांपैकी २२ हजार १३७वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली. वारंवार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी सूचना करून देखील याकडे कानाडोळा करणाऱ्या वाहनधारकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

सुरक्षेसाठी एचएसआरपी प्लेट अनिवार्य

केंद्र सरकारने वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच बनावट नंबर प्लेटला आळा घालण्यासाठी एचएसआरपी अनिवार्य केली आहे. या नंबर प्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये, लेझर कोड आणि युनिक ओळख क्रमांक असल्याने वाहनांचा मागोवा वापरल्या जाणाऱ्या वाहनांची ओळख घेणे सोपे होते. अपघात, चोरी किंवा गुन्ह्यात पटविण्यासही या प्लेटचा मोठा फायदा होतो.

बुलढाण्याचे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पवन नव्हाडे म्हणाले की, १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनधारकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे अनिवार्य आहे. ज्या वाहनधारकांनी अद्यापपर्यंत ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविली नाही, त्यांनी तत्काळ बसून घ्यावी. नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

Washim News: राष्ट्रीय लोकअदालतीत ५९४ प्रकरणे निकाली; १९ कोटीहून अधिक रक्कमेची तडजोड

Web Title: Buldhana hsrp number plate 740 vehicles fined 57 thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • HSRP
  • HSRP Plate
  • Traffic Police
  • Traffic Rules

संबंधित बातम्या

काळ्या काचांच्या वाहनांवर माळेगाव पोलिसांचा दणका; काचा उतरवून दंडात्मक कारवाई, नियमभंग करणारी वाहने केली डिटेन
1

काळ्या काचांच्या वाहनांवर माळेगाव पोलिसांचा दणका; काचा उतरवून दंडात्मक कारवाई, नियमभंग करणारी वाहने केली डिटेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.