Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : हातेडी येथे सीपीएचसी प्रशिक्षण उत्साहात; ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला बळ

बुलढाणा जिल्ह्यातील हातेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) प्रशिक्षण उत्साहात पार पडले. 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत आयोजित या प्रशिक्षणाचा उद्देश आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवून ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हा होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2026 | 09:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यातील हातेडी (ता. बुलढाणा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) प्रशिक्षण उत्साहात पार पडले. ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव कसं काय?’ या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविणे हा होता.

Sudhir Gadgil : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात विविध स्किल स्टेशनच्या माध्यमातून सहभागी कर्मचाऱ्यांना सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. गरोदर माता व प्रसूती सेवा, नवजात बालकांचे आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, नेत्र, कान-नाक-घसा, मौखिक व मानसिक आरोग्य, वृद्धांची काळजी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच योग आणि आरोग्य संवर्धन अशा १३ महत्त्वाच्या विषयांचा प्रशिक्षणात समावेश होता.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि मानसिक तणाव यांसारख्या वाढत्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. रुग्ण दवाखान्यात येण्यापूर्वीच आरोग्य सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल यांनी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) आणि आशा स्वयंसेविकांना सीपीएचसीचे प्रभावी प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती दिली. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरपंच श्रीकांत जाधव यांनी ‘आरोग्य सेवा हीच पूजा, रुग्ण हाच परमेश्वर’ हा संदेश देत आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवाभावाने कार्य करण्याचे आवाहन केले. बुलढाणा जिल्ह्याला ‘आरोग्य संपन्न जिल्हा’ बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सिंदखेड राजा विकासाला गती! विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; आणखी १२ गावांचा समावेश

प्रशिक्षणासाठी डॉ. नीलेश जाधव, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. जीवन भारती, डॉ. संतोष सांगळे, स्वाती शेंद्रे, सुवर्णा बेलसरे, सुनिता जवंजाळ, कविता खाडे, सुलोचना परहाड तसेच राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर अंतर्गत अमरावती येथील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे संदेशशी लाटकर आणि भाऊसाहेब वावरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य पर्यवेक्षक सुनील लोखंडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हातेडीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Buldhana news cphc training held with enthusiasm at hatedi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • buldhana news

संबंधित बातम्या

नैसर्गिक नाल्याच्या वादातून मुलाने आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा दावा; मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी
1

नैसर्गिक नाल्याच्या वादातून मुलाने आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा दावा; मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.