Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नैसर्गिक नाल्याच्या वादातून मुलाने आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा दावा; मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी

वाशिम जिल्ह्यातील मेहा येथील कडू कुटुंबाने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलल्यामुळे शेतीचे नुकसान होऊन गंभीर आर्थिक व मानसिक संकट ओढवल्याचा आरोप केला आहे. या तणावातून प्रफुल्ल कडू यांनी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या निवेदनात केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 21, 2026 | 06:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मेहा गावातील कडू कुटुंबाने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्यात आल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक व आर्थिक तणावामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा गंभीर दावा केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे रवाना; ७०० वारकरी १,३०० किमींची पायी वारी करणार

भास्कर विनायक कडू (वय ७०), त्यांची पत्नी ललिता कडू आणि सून अनुराधा प्रफुल्ल कडू यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतालगत अनेक वर्षांपासून असलेल्या नैसर्गिक नाल्याचा मूळ प्रवाह रोखण्यात आला किंवा बदलण्यात आला. त्यामुळे पावसाचे पाणी नदीकडे न वाहता थेट त्यांच्या शेतात साचू लागले, ज्याचा शेती उत्पादनावर आणि कुटुंबाच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला.

कुटुंबाचा आरोप आहे की, या प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी चुकीचा स्थळ पाहणी अहवाल तयार केला. त्या अहवालाच्या आधारे तहसील स्तरावरही चुकीचे आदेश देण्यात आले. संबंधित गैरअर्जदार आणि काही अधिकाऱ्यांच्या कथित संगनमतामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे कुटुंबावर मोठा मानसिक, सामाजिक आणि आर्थिक ताण निर्माण झाला. त्यातूनच प्रफुल्ल भास्कर कडू यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. निवेदनात या घटनेचे वर्णन शेतीतील नुकसान, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावातून घडलेली दुर्दैवी मानवी शोकांतिका असे करण्यात आले आहे.

कडू कुटुंबाने प्रशासनाकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. नव्याने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पूर्वीच्या अहवालांची आणि आदेशांची तपासणी करण्यात यावी तसेच वस्तुस्थितीच्या आधारे नवीन निर्णय घेण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे.

वाहनचालकांच्या खिशाला बसणार फटका; पुण्यात ‘नो पार्किंग’वरील टोईंग कारवाई पुन्हा सुरू

याशिवाय, या प्रकरणात जबाबदार असलेल्या संबंधितांवर योग्य कारवाई करून कुटुंबाला न्याय मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. कुटुंबाने प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, या कालावधीत ठोस पावले न उचलल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Web Title: Family claims son committed suicide over a dispute regarding a natural drain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श उपक्रम; टीबी रुग्णाला दत्तक घेत सहा महिन्यांच्या पोषण आहाराची जबाबदारी
1

Buldhana News : जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श उपक्रम; टीबी रुग्णाला दत्तक घेत सहा महिन्यांच्या पोषण आहाराची जबाबदारी

Tadvale News : प्रशासनाचे दुर्लक्ष, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता! तडवळे येथे रस्त्यालगतची धोकादायक विहीर त्वरित मुजवा..
2

Tadvale News : प्रशासनाचे दुर्लक्ष, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता! तडवळे येथे रस्त्यालगतची धोकादायक विहीर त्वरित मुजवा..

Buldhana News : खोटे गुन्हे रद्दसाठी काँग्रेसची निदर्शने! संस्थेच्या विश्वस्तांना बदनाम करण्याचा डाव : अवचार
3

Buldhana News : खोटे गुन्हे रद्दसाठी काँग्रेसची निदर्शने! संस्थेच्या विश्वस्तांना बदनाम करण्याचा डाव : अवचार

पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; मशागत पूर्ण, पण पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
4

पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; मशागत पूर्ण, पण पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.