Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद! गिरडा परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर केला होता हल्ला

बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यात आल्याने गिरडा परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंबाबारवा अभयारण्यात त्याची सुरक्षितपणे पुनर्स्थापना करण्यात येणार असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2026 | 07:47 PM
फोटो सौजन्य - Social Mediaफोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Mediaफोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा: गिरडा परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर वारंवार हल्ले करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद केले आहे. गावालगत लावलेल्या अमिष पिंजऱ्यात हा बिबट्या बुधवारी सकाळी अडकला. या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून भीतीच्या छायेत असलेल्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

FDA On BMC Canteen: मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

बुलढाणा वनपरिक्षेत्रातील गिरडा गाव अजिंठा पर्वतरांगेच्या परिसरात असून गावालगत दाट जंगल आहे. या भागात बिबट्या, अस्वल, तडस यांसारख्या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. काही दिवसांपूर्वी एका बिबट्याने गावातील दोन गोठ्यांमध्ये घुसून नऊ शेळ्या आणि एका वासरावर हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवला होता. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर वन विभागाने गावाजवळ अमिष पिंजरा लावला होता. बुधवारी सकाळी या पिंजऱ्यात एक मादी बिबट अडकली. मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन उपवनसंरक्षक जमीर मुनीर शेख यांनी यापूर्वी गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता आणि ग्रामस्थांशी संवाद साधला होता.

ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत वनपाल प्रफुल्ल मोरे, रेस्क्यू पथकातील संदीप मडावी, अमोल चव्हाण, पवन वाघ, स्वप्निल वानखेडे, वनरक्षक विक्रम राऊत, अमोल हिवाळे तसेच गावातील सरपंच पुत्र अजय गायकवाड, उपसरपंच योगेश गायकवाड, पोलिस पाटील गजानन चांदळकर आणि इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Satara Protest: भर पावसात विद्यार्थ्यांचा एल्गार! ‘नीट’ पेपरफुटीविरोधात मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्यानंतर वन विभागाने त्याला तपासणीसाठी बुलढाणा येथील राणीबागेत आणले. पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. डी. मेटागळे यांनी वैद्यकीय तपासणी करून बिबट सुदृढ असल्याचे सांगितले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या मादी बिबट्याला अंबाबारवा अभयारण्यात सोडण्यासाठी रवाना करण्यात आले. वन विभागाने ग्रामस्थांना जंगल परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन करत वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास त्वरित माहिती देण्याचेही सांगितले.

Web Title: Buldhana news rampaging leopard finally captured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’
1

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
2

Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश
3

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश

Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी
4

Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.