Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी

Lek Ladki Scheme Maharashtra: बुलढाणा जिल्ह्यात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देऊन त्यांच्या शिक्षण व आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी लेक लाडकी योजना हजारो कुटुंबांसाठी आधार ठरत आहे. जिल्ह्यात १४,६२० कुटुंबांनी नोंदणी केली असून, त्यापैकी सुमारे १२,३०० कुटुंबांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 10, 2026 | 07:17 PM
Lek Ladki Scheme Maharashtra,

Lek Ladki Scheme Maharashtra,

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात ‘लेक लाडकी’चा मोठा आधार
  • १२,३०० कुटुंबांना लाभ, १४,६२० जणांची नोंदणी
  • मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात
विनोद सावळे

बुलढाणा: मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांच्या शिक्षणाला व भविष्यातील आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना जिल्ह्यातील हजारो कुटुंबांसाठी आधारवड ठरत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात तब्बल १४ हजार ६२० कुटुंबांनी लाभासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे १२ हजार ३०० कुटुंबांना योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे मुलींच्या संगोपनासह त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळण्यास हातभार लागत आहे.

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम

समाजामध्ये मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, मुलींचे शिक्षण, संगोपन तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, हा लेक लाडकी योजनेचा प्रमुख उद्देश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींना या योजनेमुळे विविध टप्प्यांवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यात योजनेबाबत जनजागृती करण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने कुटुंबांनी आपल्या मुलींच्या नावाने नोंदणी केली. आतापर्यंत १४ हजार ६२० कुटुंबांनी लाभासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी १२ हजार ३०० कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. उर्वरित अर्जाची प्रक्रिया विविध कारणांमुळे सुरू असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थीनाही योजनेचा लाभमिळण्याची अपेक्षा आहे. लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदतीचा हात मिळत असल्याने अनेक कुटुंबांना दिलासा मिळत आहे. विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. मुलींच्या शिक्षणामध्ये आर्थिक योजनेच्या अडचणी येऊ नयेत आणि त्यांचे भविष्य अधिक सक्षम व्हावे, या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली. माध्यमातून मुलींच्या जन्माकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता वाढण्यास मदत होत आहे, मुलगा-मुलगी भेदभाव कमी करून मुलींना समान संधी मिळावी, त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि त्या स्वावलंबी बनाव्यात आले आहे.

२२४५ अर्ज आयुक्त कार्यालयाकडे ऑनलाइन सादर

लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी तालुकास्तरावरून महिला व बालविकास कार्यालयाला प्राप्त झालेले २२४५ अर्जाना मान्यता देऊन आयुक्त कार्यालयाकडे ऑनलाईन पाठविले आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आवश्यक कागदपत्रे

  • पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला
  • महाराष्ट्र राज्य आदिवासी पुरावा अनिवार्य
  • लाभार्थी मुलीचा जन्म, मुलीचे आधार कार्ड व लाभार्थीच्या आईच्या आधार कार्ड
  • लाभार्थी व आईचे संयुक्त बैंक खात्याच्या पासबुकचे छायांकित प्रत
  • लाभार्थींची आई हयात नसेल तर मृत्यूचा दाखला व वडीलाचे आधार कार्ड
  • लाभार्थी व वडिलाचे संयुक्त बैंक खाते आधार लिंक आवश्यक
  • बुलढाण्याचे महिला व बालविकास अधिकारी, प्रमोद एंडोले म्हणाले की, लेक लाडकी योजनेसाठी पात्र लाभाथ्यांनी अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून नोंदणी करावी.
Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना

Web Title: Buldhana lek ladki yojana 12300 families benefit 14620 registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन
1

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड
2

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी
3

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना
4

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.